Saturday, July 5, 2025

ISRO EOS-8 Satellite : यंदाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त इस्रो देणार एक खास भेट; अवकाशात सोडणार...

ISRO EOS-8 Satellite : यंदाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त इस्रो देणार एक खास भेट; अवकाशात सोडणार...

श्रीहरिकोटा : अवकाश क्षेत्रामध्ये प्रगती करणाऱ्या अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) नेहमीच चांगली कामगिरी बजावली आहे. चांद्रयान ३, आदित्य एल १ अशा मोहिम यशस्वीरित्या पुर्ण करत आता २०२८ साली चांद्रयान ४ या मोहिमेच्या तयारीसाठी सज्ज झाले आहे. त्यातच इस्रोकडून (ISRO) एक आनंदाची बातमी समोर आली आहे. इस्रो यंदाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त (Independence Day) देशवासीयांना खास भेट देण्याच्या तयारीत आहे. येत्या १५ ऑगस्ट रोजी इस्त्रो नवे सॅटेलाईट लाँच करणार आहे. त्यामुळे यंदाचा स्वातंत्र्य दिन विशेष ठरणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, इस्रो येत्या काळात ऑब्जर्वेशन सॅटेलाईट (EOS-8) लाँच करणार आहे. १५ ऑगस्ट रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून सकाळी ९ वाजून १७ मिनिटांनी हा उपग्रह लाँच केला जाणार आहे. या सॅटेलाईटचे वजन १७५.५ किलोग्रॅम असल्याची माहिती मिळत आहे. तसेच इस्रोच्या या सॅटेलाईटमुळे वातावरणाचे निरीक्षण, आपत्ती व्यवस्थापन आणि इतर तांत्रिक गोष्टींसंदर्भात महत्त्वाचे योगदान दिले जाणार आहे.



कसा होणार EOS-8चा उपयोग?


इस्रोच्या EOS-8 या मोहिमेची मदत वणवा, ज्वालामुखी या आणि अशा अनेक संकटांसह त्सुनामी, वादळ, समुद्राच्या पृष्ठावरील वादळ याचे विष्लेषण करत यंत्रणांना सावध करण्यासाठी होणार आहे. जमिनीतील आर्द्रता आणि पूरस्थिती यासोबतच अनेक गोष्टींमध्ये मदत करणाऱ्या या मोहिमेची मदत मिशन गगनयानमध्येही मिळणार आहे.


दरम्यान, या मोहिमेअंतर्गत इस्रोच्या या उपग्रहाचा कालावधी १ वर्ष असून हे सॅटेलाईट पृथ्वीच्या पृष्ठभागापासून साधारणत: ४७५ किमी अंतरावर घिरट्या घालणार आहे. त्याचबरोबर हा उपग्रह अवकाशात पोहोचवण्यासाठी एसएसएलव्ही (SSLV) रॉकेटचा वापर करण्यात येणार आहे. ही मोहिम यशस्वी करण्यासाठी इस्रोची संपूर्ण टीम अथक परिश्रम करत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा