Sunday, June 22, 2025

Paris Olympic 2024: मी हरले, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरल्यानंतर विनेश फोगटचा कुस्तीला अलविदा

Paris Olympic 2024: मी हरले, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरल्यानंतर विनेश फोगटचा कुस्तीला अलविदा
मुंबई: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवण्याचे स्वप्नभंग झाल्यानंतर विनेश फोगाटने कुस्तीला अलविदा म्हटले आहे. भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाटने ऑलिम्पिकमधून अपात्र घोषित झाल्यानंतर निवृत्तीची घोषणा केली. तिने एक्सवर भावूक मेसेज शेअर केला. तिने आपले दु:ख करताना म्हटले, आई कुस्ती जिंकली आणि मी हरले. मला माफ करा. माझी हिंमत तुमचे स्वप्न सगळं काही मोडलं आहे. आता यापेक्षा अधिक ताकद नाही. अलविदा कुस्ती २००१-२०२४. मी सगळ्यांची नेहमीच ऋणी राहीन.

 



विनेश फोगाटने सेमीफायनलमध्ये आपला सामना ५-० असा जिंकला होता. त्यानंतर ती ऑलिम्पिकच्या फायनलसाठी क्वालिफाय करणारी पहिली महिला कुस्तीपटू ठरली होती.

१०० ग्रॅम वजनामुळे अपात्र ठरली


खरंतर बुधवारी पॅरिस ऑलिम्पिक २०२४मध्ये ५० किलो फ्री स्टाईल फायनलमध्ये विनेशला अपात्र घोषित करण्यात आले होते. २९ वर्षाच्या या कुस्तीपटूचे वजन फायनलच्या दिवशी वेट इनदरम्यान मर्यादेपेक्षा १०० ग्रॅम अधिक आढळले होते. त्यामुळे तिला अपात्र घोषित करण्यात आले होते.

अमेरिकेच्या कुस्तीपटूशी होता सामना


भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाट फायनलमध्ये पोहोचल्यानंतर हे मानले जात होते की ती सुवर्णपदक जिंकेल. तिने मंगळवारी महिला ५० किलो वजनी गटात सेमीफायनलमध्ये क्युबाच्या युसनेईलिस गुजमॅनला ५-० अशी मात दिली होती. फायनलमध्ये विनेशचा सामना यूएसएच्या सारा हिल्डेब्रांटशी होणार होता.

 
Comments
Add Comment