Wednesday, March 26, 2025
Homeमहाराष्ट्रकोकणMumbai Goa Highway : गणेशोत्सवापूर्वीच गणेशभक्तांचा कोकण प्रवास खड्डे मुक्त करणार!

Mumbai Goa Highway : गणेशोत्सवापूर्वीच गणेशभक्तांचा कोकण प्रवास खड्डे मुक्त करणार!

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे खासदार रविंद्र वायकर यांना आश्वासन

दिल्ली : गणेशोत्सवापूर्वी कोकणात जाण्यासाठी रस्ते प्रवास करणाऱ्या गणेशभक्तांच्या मार्गात कुठलेही विघ्न येऊ नये याची खबरदारी घेण्याबरोबरच गणेशोत्सवापूर्वीच मुंबई गोवा मार्गावरील (Mumbai Goa Highway) खड्डे बुजवण्यात येतील, असे आश्वासन केंद्रीय रस्ते परिवहन व राज्य मार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई उत्तर पश्चिमचे खासदार रविंद्र वायकर यांना दिले.

मुंबई गोवा राज्य मार्गाच्या (Mumbai Goa Highway) चौपदरीकरणाचे काम गेल्या १० वर्षापासून सुरु आहे. ४७१ कि.मी. रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम २०११ पासून सुरु करण्यात आले. अद्याप हे काम पूर्ण झाले नसून या कामाला विलंब होत आहे. या राज्य मार्गाचे काम टप्प्याटप्प्याने करण्यात येत आहे. या मार्गाचे काम पूर्ण करण्यात आले असले तरी त्यातील अनेक ठीकाणावरील रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे या राज्य मार्गावरून प्रवास करताना प्रवाशांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्गावरील प्रवास खड्डे मुक्त करावा, असे निवेदन खासदार रविंद्र वायकर यांनी मंत्री गडकरी यांना दिले. गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा राज्य मार्गावरील खड्डे बुजवण्यात येतील, असे आश्वासन मंत्री नितिन गडकरी यांनी दिले आहे.

त्याचबरोबर या मार्गावर (Mumbai Goa Highway) बांधण्यात येणारे ट्रामा हॉस्पिटलचे काम लवकर सुरु करून ते पूर्ण करावे, अशी विनंती वायकर यांनी मंत्री नितिन गडकरी यांना यावेळी केली. तसेच डिसेंबरपर्यंत या राज्य मार्गाच्या चौपदरी करण्याचे काम पूर्ण करण्यात येईल, असेही मंत्री गडकरी यांनी यावेळी सांगितले.

मुंबई गोवा राज्य मार्गावरील (Mumbai Goa Highway) भोस्ते घाट येथे मोठ्या प्रमाणात अपघात होतात. भोस्ते व परशुराम घाट येथे भूउत्खलन होत आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी टनेल बांधण्याचे काम करण्यात यावे, अथवा रेल्वे मार्गाला लागून समांतर रस्ता तयार करण्यात यावा, अशी मागणी वायकर यांनी गडकरी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -