मुंबई: डेंग्यू झाल्यास सगळ्यात गरजेचे आहे ते म्हणजे खाण्यापिण्यावर लक्ष देणे. लवकर बरे होण्यासाठी तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये व्हिटामिन सीने भरपूर असलेली फळे आणि भाज्यांचा समावेश करायला हवा.
दिवसभर शरीराला हायड्रेट राखणे गरजेचे असते. जाणून घ्या डेंग्यू झाल्यास कोणती फळे खायला हवीत?
डेंग्यूचा ताप हा धोकादायक मानला जातो. डेंग्यू झाल्यास शरीरातील प्लेटलेट्स कमी होऊ लागतात. यामुळे अशक्तपणा येतो. सातत्याने उलटी, ताप तसेच डोकेदुखी होते. यामुळे संपूर्ण शरीराची हालत बिघडते.
डेंग्यू लवकर बरा होण्यासाठी खाण्या-पिण्याकडे खास लक्ष दिले पाहिजे. डाएटमध्ये व्हिटामिन सी असलेल्या फळांचा समावेश करावा. जितके शक्य असेल तितके पाणी प्या. शरीराला हायड्रेट ठेवा. यामुळे डेंग्यू लवकर बरा होण्यास मदत मिळते.
किवी – डेंग्यूच्या रुग्णांना किवी खाण्याचा सल्ला दिला जातो. किवीमध्ये व्हिटामिन सी असते जे शरीराला रोगप्रतिकारक शक्ती प्रदान करते. किवीमुळे प्लेटलेट्स वाढण्यास मदत होते.
डाळिंब – डेंग्यूचे रुग्ण डाळिंब खाऊ शकतात. डाळिंबामध्ये अँटीऑक्सिडंट आढळतात. यात व्हिटामिन सीही असते. डाळिंब खाल्ल्याने लाल रक्तपेशी वाढतात. डाळिंब खाल्ल्याने थकवा आणि अशक्तपणा दूर होतो.
पपई – फायबरने भरपूर असलेला पपई डेंग्यूच्या रुग्णांसाठी अतिशय फायदेशीर आहे. यात व्हिटामिन सी आणि व्हिटामिन ए असते. डेंग्यूचा ताप आल्यास पपईच्या पानांचा रस दिला जातो. यामुळे प्लेटलेट्स वाढतात.
सफरचंद – डेंग्यू असो वा कोणताही ताप, सफरचंद हे असे फळ आहे जे तुम्ही सहज खाऊ शकता. सफरचंदामध्ये गरजेचे व्हिटामिन आणि मिनरल्स असतात. यामुळे ताप लवकर बरा होण्यास मदत होते.