Saturday, July 5, 2025

Death: कुत्रा अंगावर पडल्याने चिमुकलीचा मृत्यू

Death: कुत्रा अंगावर पडल्याने चिमुकलीचा मृत्यू

मुंबई: ठाणे जिल्ह्यात हैराण करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाण्यातील मुंब्रा परिसरात पाचव्या मजल्यावरून कुत्रा अंगावर पडल्याने एका तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. या घटनेने चिमुकलीच्या आईवडिलांना प्रचंड धक्का बसला आहे.


कुत्रा पडल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की रस्त्याच्या बाजूला फळ-भाज्यांच्या गाड्या लागल्या आहे. त्याच्या बाजूने दोन महिला पुढे-मागे चालत होत्या. या दोन महिलांच्या मध्ये एक छोटीसी मुलगी आहे. त्याचवेळेस अचानक वरून एक कुत्रा मुलीच्या अंगावर पडते. महिला त्या मुलीला उचलण्यासाठी जातात. एक महिला मुलीला उचलून घेते. तर कुत्रा तेथेच रस्त्यावर पडलेला आहे.


 


पोलिसांच्या माहितीनुसार या मुलीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मुलीचे वय केवळ तीन वर्षे होते. तपासादरम्यान आढळले की कुत्रा पाचव्या मजल्यावरून रस्त्यावर पडला होता. हा पाळीव कुत्रा होता. तसेच हा कुत्रा चुकून पडला की त्याला फेकण्यात आले याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, चिमुकलीच्या अचानक जाण्याने तिच्या कुटुंबियांचे मात्र रडून रडून हाल झाले आहेत.


ही घटना बुधवारी संध्याकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. कुत्रा अंगावर पडल्याने मुलीला गंभीर दुखापती झाल्या. मुलीच्या आईने पोलिसांना सांगितले की त्यांना आपल्या मुलीच्या मृ्त्यूमागे काहीही संशयास्पद दिसत नाही.

Comments
Add Comment