मुंबई: भारतात गेल्या महिन्यापासून टेलिकॉम कंपन्या आणि त्यांच्या रिचार्ज प्लान्सची चर्चा होत आहे. जिओ एअरटेल आणि व्होडाफोनआयडिया म्हणजेच व्हीआयने आपल्या पोस्टपेड आणि प्रीपेड प्लान्सच्या किंमतीत खूप वाढ केली आहे. यामुळे युजर्सच्या खिशावर परिणाम झाला आहे.
या प्लानचे खास वैशिष्ट्य
दरम्यान, आज आम्ही तुम्हाला एअरटेलच्या अशा रिचार्ज प्लानबद्दल सांगणार आहोत जो या महागाईच्या काळात तुम्हाला दिलासा देईल. एअरटेलच्या या प्लानमध्ये युजर्सला एकाच रिचार्ज प्लानमध्ये दोन सिम चालवण्याची संधी मिळते. इतकंच नव्हे तर या प्लानसोबत एअरटले युजर्स अॅमेझॉन प्राईम व्हिडिओ आणि डिस्नी हॉटस्टारचीही मजा घेऊ शकतात. या प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉल, डेटा सोबत अनेक फायदेही मिळतात.
एअरटेलच्या या प्लानची किंमत ६९९ रूपये आहे. हा एअरटेलचा फॅमिली प्लान आहे. यात युजर्सला दोन सिम कार्ड वापरण्याची संधी मिळते. सोबतच या प्लानसोबत युजर्सला अनलिमिटेड एसटिडी आणि लोकल कॉल करण्याचा फायदा मिळतो. याशिवाय युजर्सला अनलिमिटेड रोमिंगची सुविधा मिळते.
डेटा बेनेफिटबद्दल बोलायचे झाल्यास या प्लानमध्ये युजर्सला ७५ जीबी डेटा मिळतो. सोबतच युजर्सला अॅमेझॉन प्राईम व्हिडिओ आणि डिस्ने प्लस हॉटस्टारचेही मोफत सबस्क्रिप्शन मिळते. याशिवाय या प्लानसोबत युजर्सला Wynk Music चाही अॅक्सेस मिळतो. एअरटेलचा हा पोस्टपेड प्लान आहे.