मुंबई: भारतात जिथे सामान्य माणूस वाढत्या टॅक्समुळे त्रस्त झाला आहे तिथे भारतात असे एक राज्य आहे जेथील नागरिकांना टॅक्सचा बोजा उचलावा लागत नाही. येथील लोकांना कोणत्याही प्रकारचा टॅक्स द्यावा लागत नाही.
खरंतर हे दुसरे तिसरे कोणतेही राज्य नसून सिक्कीम आहे. सिक्कीम आपली सुंदरता आणि सांस्कृतिक वारशासाठी ओळखले जाते. इतर भारतीय राज्यांच्या तुलनेत सिक्कीमला विशेष अधिकार मिळाला आहे. येथील नागरिकांना टॅक्समध्ये सूट मिळते.
सिक्कीम हे राज्य १९७५मध्ये देशातील २२वे राज्य म्हणून भारतात सामील झाले होते. १९४८मध्ये आपल्या स्वत:च्या टॅक्स कायद्यानुसार येथे हा खास नियम आहे.
आता तुम्हीही विचार कराल की येथे राहून तुम्हीही टॅक्स फ्री होऊ शकता. मात्र असे नाही आहे. टॅक्स फ्री होण्याचा लाभ केवळ त्याच व्यक्तींना मिळतो जे येथील निवासी आहेत.
गैर सिक्कीम पुरूषाशी जर एखाद्या महिलेने लग्न केले तर त्या व्यक्तीलाही टॅक्समधून सूट मिळत नाही.