Thursday, October 23, 2025
Happy Diwali

PM Modi : 'विनेश तू भारताचा गौरव आहेस, शिवाय...'

PM Modi : 'विनेश तू भारताचा गौरव आहेस, शिवाय...'

विनेश फोगाट अपात्र झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी दिली प्रतिक्रिया!

नवी दिल्ली : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympic 2024) कुस्तीचे मैदान गाजवणारी विनेश फोगाट (Vinesh Phogat) हिला अतिवजनामुळे अंतिम फेरीतून अपात्र घोषित करण्यात आले. भारतीयांना सुवर्ण पदकाची आशा देणारी विनेश फोगाटला अयोग्य ठरवल्यामुळे भारताला मोठा धक्का बसला. भारताचे सुवर्ण पदक हुकल्यामुळे सर्व क्रीडापटूंनी नाराजीचा सूर मारला. दरम्यान या निर्णयानंतर त्यावर विविध क्षेत्रांतून प्रतिक्रिया येत आहेत. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देखील विनेश फोगाटला धीर देण्यासाठी एक खास ट्वीट केले आहे.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

पंतप्रधान यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत विशेनला धीर देण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की, विनेश तू भारताचा गौरव आहेस. शिवाय तू प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणास्त्रोत आहे. तुझं अपात्र ठरवलं जाणं हे वेदनादायी आहे. ही बातमी ऐकून मला जे दुख: होतं आहे, ते मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. त्याचबरोबर आव्हान स्वीकारणं हा नेहमीच तुझा स्वभाव राहिला असून तू नक्कीच पुनरागमन करशील, असा आम्हाला विश्वास आहे. आम्ही सर्व तुझ्या पाठिशी आहोत, असे देखील पंतप्रधान मोदी म्हणाले.

Comments
Add Comment