Saturday, March 22, 2025
Homeक्रीडाParis Olympics 2024: भारताच्या खात्यात येणार २ सुवर्णपदके? नीरज-विनेशकडे संधी

Paris Olympics 2024: भारताच्या खात्यात येणार २ सुवर्णपदके? नीरज-विनेशकडे संधी

मुंबई: ऑलिम्पिक स्पर्धा सुरू होण्याआधीपासूनच प्रत्येक भारतीयाच्या तोंडी एकच नाव होते ते म्हणजे नीरज चोप्रा. नीरज चोप्रा आणि टोकियोमध्ये इतिहास रचणाऱ्या भालाफेक चॅम्पियनने यावेळेसही निराश केले नाही. तर कुस्तीच्या मैदानात विनेश फोगाटच्या असाधारण कामगिरीमुळे भारताचे एक पदक निश्चित झाले आहे. दोन्ही खेळाडू आपापल्या स्पर्धेत फायनलला पोहोचले आहेत.

आता विनेशचा अंतिम फेरीतील सामना बुधवारी ७ ऑगस्टला रंगणार आहे. तिच्याकडे फायनल जिंकून सुवर्णपदक जिंकण्याची संधी आहे. तर नीरज चोप्रा ८ ऑगस्टला ११ वाजून ५० मिनिटांनी सुवर्णपदक जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. जर्मनीविरुद्ध पराभवानंतर भारतीय हॉकी संघाकडे कांस्यपदक जिंकण्याची संधी आहे.

भारताने या ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत ३ कांस्यपदक जिंकली आहेत. भारत गुणतालिकेत ६३व्या स्थानावर आहे. तर अमेरिका, चीन आणि ऑस्ट्रेलिया पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर कायम आहेत.

नीरजने मंगळवारी झालेल्या क्वालिफिकेशन राऊंडमध्ये पहिल्याच प्रयत्नात ८९.३४ मीटरचा थ्रो फेकत पुरुष भालाफेक स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला तर महिला कुस्तीपटू विनेशने आपल्या प्रतिस्पर्ध्यांना हरवत फायनलमध्ये स्थान मिळवले.

अविनाश साबळेही अंतिम फेरीत

भारताच्या अविनाश साबळेनेही ३००० मीटर स्टीपलचेस प्रकारात अंतिम फेरीत धडक मारली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -