मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा तीन जागांचे वर्णन नितीशास्त्रात केले आहे जिथे तुम्ही घर खरेदी करू नये. आचार्य चाणक्य यांच्या मते ज्या व्यक्ती अशा ठिकाणी घर घेतात त्यांच्या आयुष्यात सतत समस्या येत राहतात.
आचार्य चाणक्य म्हणतात की जेव्हा एखाद्या मनुष्याला घर घ्यायचे आहे अथवा बनवायचे असेल तर त्या व्यक्तीने तेथे आपल्या रोजगाराचे साधन पाहिले पाहिजे.
घर नेहमी अशा ठिकाणी असले पाहिजे जिथे रोजगाराचे चांगले साधन असेल. तसेच सामान्य माणूस नोकरी अथवा व्यवसाय करू शकला पाहिजे. आचार्य चाणक्य यांच्या मते ज्या ठिकाणी रोजगाराचे साधन मिळत नाही तेथे घर घेतल्यास आयुष्यभर पश्चाताप करावा लागतो.
आचार्य चाणक्य म्हणतात की जिथे रोजगाराचे चांगले साधन नसते. अशा ठिकाणी घर घेणारे लोक गरिबीची शिकार ठरतात.
तसेच अशा ठिकाणीही घर घेऊ नये जिथे आजूबाजूची वस्ती योग्य नसेल तसेच कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असेल
कधीही या ३ ठिकाणी खरेदी करू नका घर, आयुष्यभर होईल त्रास
