Wednesday, March 26, 2025
Homeक्रीडाManu Bhaker : मनू भाकर भारतात दाखल; चाहत्यांकडून जंगी स्वागत!

Manu Bhaker : मनू भाकर भारतात दाखल; चाहत्यांकडून जंगी स्वागत!

देशवासीयांना दिलेल्या पहिल्या प्रतिक्रियेत म्हणाली की…

नवी दिल्ली : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympics 2024) कौतुकास्पद कामगिरी करणारी मनू भाकर (Manu Bhaker) आज भारतात दाखल झाली आहे. एकाच खेळात दोन पदके मिळवणारी पहिली भारतीय महिला मनू भाकर ही आज सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरली. एअरपोर्टवर येताच तिचे चाहत्यांकडून तिचे जंगी स्वागत करण्यात आले. पॅरिस ऑलिम्पिकमधील नेमबाजीच्या खेळात मनू भाकेर सुवर्णपदकाची दावेदार होती. मात्र काही गुणांमुळे तिने कांस्य पदक पटकावले. मात्र तिच्या या कामगिरीचे संपूर्ण जगभरात प्रचंड कौतुक होत आहे. आज भारतात परतताच चाहत्यांनी मनी भाकरचे ढोल ताशाच्या गजरात स्वागत केले. तसेच मनू भारतात आल्यानंतर तिने देशवासीयांना खास शब्दांमध्ये प्रतिक्रिया देखील दिली.

काय म्हणाली मनू भाकर?

“भारतासाठी पदकं जिंकल्याचा मला खूप खूप आनंद झाला आहे. आपले अ‍ॅथलिट्स यापुढेही चांगली कामगिरी करतील असा मला विश्वास आहे. अनेक पदके भारताला मिळाली पाहिजेत, असेही मत मनू भाकरने यावेळी व्यक्त केले. तसेच मला नेमबाजीच्या एकेरी व दुहेरी प्रकारात कांस्य पदक मिळाले. परंतु अवघ्या १ शॉट चुकल्याने तिसरे पदक जिंकता आले नसल्याचे वाईट वाटत आहे. पण दोन पदक जिंकल्याचा खूप आनंद झाला”, असे मनू भाकरने यावेळी म्हटले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -