मुंबई: स्मार्टफोन(smartphone) खरेदी करण्याआधी लोक त्याच्या कॅमेऱ्याची क्वालिटी चेक करतात. स्मार्टफोनमधून चांगल्या क्वालिटीचे फोटो काढायचे असतात. फोटोचे शौकीन असलेले लोक अनेकदा स्मार्टफोनमधून चांगले फोटो कॅप्चर करण्याचा प्रयत्न करतात. मात्र डीएसएलआरसारखे फोटो येत नाही. दरम्यान, काही ट्रिक्स वापरून तुम्ही स्मार्टफोनमधूनही डीएसएलआरसारखे फोटो काढू शकता.
या सोप्या पद्धतीने मिळणार जबरदस्त फोटो
स्मार्टफोनमधून फोटो काढताना लायटिंगचा योग्य वापर करणे गरजेचे असते. नैसर्गिक प्रकाशात फोटो चांगला येतो. त्यामुळे स्मार्टफोनमधून फोटो काढण्याआधी नॅचरल लाईट्स असणे गरजेचे आगे. तर कमी प्रकाशात फोटो घेताना तुम्ही स्मार्टफोनच्या फ्लॅशच्या जागेवर एखाद्या लाईट्सचा वापर करू शकता.
स्मार्टफोन कॅमेऱ्याचा लेन्स
स्मार्टफोनमधून फोटो काढण्याआधी त्याची लेन्स साफ करा. लेन्स साफ करत राहिल्याने फोटो क्लिअर आणि चांगले येतात. तुम्ही स्मार्टफोनची लेन्स साफ करण्यासाठी मायक्रोफायबर कपड्याचा वापर करू शकता.
याशिवाय फोटो काढण्याआधी ग्रिडलाईन्सचा वापर केला पाहिजे.
अनेक मोड्सचा करा वापर
याशिवाय स्मार्टफोनमधून चांगले फोन काढण्यासाठी तुम्ही विविध मोड्सचा वापर करू शकता. स्मार्टफोनमध्ये आजकाल विविध मोड्स दिलेले असतात. ज्याच्या मदतीने तुम्ही शानदार एचडी फोटो काढू शकता. या मोड्समध्ये नाईट मोड, पोट्रेट मोड असे विविध प्रकारचे मोड आहेत.