Friday, May 9, 2025

ताज्या घडामोडीश्रध्दा-संस्कृती

चुकूनही रात्रीच्या वेळेस या २ गोष्टी देऊ नका, नाहीतर...

चुकूनही रात्रीच्या वेळेस या २ गोष्टी देऊ नका, नाहीतर...
मुंबई: वास्तुशास्त्रानुसार रात्रीच्या वेळेस काही गोष्टींचे दान कधीही घरातील बाहेर व्यक्तींना करू नये.

वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही या गोष्टी अंधार झाल्यानंतर दुसऱ्यांना देत असाल तर त्याचा नकारात्मक प्रभाव पडतो. वास्तुशास्त्राच्या मते असे केल्याने आनंद संपून जातो. तुमच्यावर दु:खाचा डोंगर कोसळू शकतो.

वास्तुशास्त्रानुसार रात्रीच्या वेळेस कधीही कोणाला दूध देऊ नये. हिंदू धर्मातील मान्यतेनुसार असे करणे अशुभ मानले जाते.

दुधाचा संबंध चंद्रासोबतच सूर्याशी असतो. यासाठी असे करणे शुभ नसते. या चुकीमुळे घराची सुबत्ता कमी होते.

वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने घरात आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागते. कुटुंबाचे सुख कमी होते.

वास्तुशास्त्रानुसार जेव्हा सूर्यास्त होतो तेव्हा चुकूनही दह्याचे दान करू नये. असे करणे अशुभ मानले जाते. दही हे शुक्राचे प्रतीक मानले जाते. यामुळे सुख-वैभव मिळते. यामुळे सूर्यास्ताआधी दह्याचे दान करावे.

वास्तुशास्त्रानुसार जे लोक सूर्यास्तानंतर दह्याचे दान करतात ते नेहमी त्रस्त राहतात. जीवनावर त्याचा वाईट परिणाम होतो.
Comments
Add Comment