Thursday, September 18, 2025

११ मंदिरांमध्ये चोरी करणारा चोर, सीसीटीव्हीमुळे सापडला

११ मंदिरांमध्ये चोरी करणारा चोर, सीसीटीव्हीमुळे सापडला

पुणे : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, शिरुर, रांजणगाव, खेड परिसरातील मंदिरात चोरी करणाऱ्या चोरट्याला ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. चोरट्याने ग्रामीण भागातील ११ मंदिरात चोरी केल्याचे उघड झाले असून, त्याच्याकडून चार लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

विनायक दामू जिते (रा. कान्हूर मेसाई ता. शिरुर) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. आंबेगाव, शिरूर, शिक्रापुर, रांजणगाव, खेड भागातील मंदिरातून रोकड चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. पोलिसांनी मंदिरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले होते. सराईत चोरटा जितेने चोरी केल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे, अमोल वडेकर, संजय साळवे, मंगेश अभंग यांना तपासात मिळाली. तो शिक्रापूर परिसरात येणार असल्याची महिती मिळाली. त्यानंतर सापळा लावून त्याला पकडले, अशी माहिती पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी अमोल मांडवे यावेळी उपस्थित होते.

जितेने ग्रामीण भागातील वेगवेगळ्या मंदिरात चोरी केल्याचे तपासात उघड झाल आहे. जिते सराइत चोरटा आहे. मंदिरात रात्रीच्या वेळी भाविकांची वर्दळ कमी असते. हीच संधी साधून जितेने मध्यरात्री गुन्हे केले. त्याच्याकडून एक लाख ६३ हजारांचे दागिने, एक लाख १७ हजारांचे चांदीचे मुखवटे, ८० हजारांचे पूजासाहित्य जप्त करण्यात आले.

Comments
Add Comment