Thursday, March 27, 2025
Homeताज्या घडामोडीMLA disqualification : ठाकरे गटाच्या वकिलांवर भडकले सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश!

MLA disqualification : ठाकरे गटाच्या वकिलांवर भडकले सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश!

आमदार अपात्रता सुनावणीवेळी नेमकं काय घडलं?

नवी दिल्ली : शिवसेना (Shivsena) तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या (NCP) फुटीनंतर कोणाचा पक्ष खरा यासोबतच आमदार अपात्रतेचा मुद्दा (MLA disqualification) निकालात येणं बाकी आहे. पक्ष सोडून जाणाऱ्या आमदारांबद्दल ठाकरे गट व शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात (Supreme Court) याचिका दाखल केली होती. सुप्रीम कोर्टाने हा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवला होता. नार्वेकरांनी शिवसेना व ठाकरे गट यांपैकी बहुमताच्या जोरावर खरी शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची असल्याचा निकाल देत कोणत्याही गटाचे आमदार अपात्र ठरवले नाहीत. राष्ट्रवादीच्या बाबतीतही त्यांनी असाच निकाल दिला. हा निकाल न पटल्याने तो पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाच्या दरबारी गेला.

यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या दोन्ही प्रकरणांवर एकाच दिवशी सुनावणी करु, असं म्हटलं होतं. त्यानुसार आज सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टात नेमकं काय घडलं, याची माहिती ॲड. सिद्धार्थ शिंदे (Sidharth Shinde) यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की शिवसेनेची कागदपत्रं पूर्ण आहेत पुढील सुनावणी वेळी आम्ही थेट युक्तिवाद ऐकून घेऊ. त्यासाठीची तारीख आम्ही लवकरच देऊ.

यावेळी कोर्टरुममध्ये मुख्य न्यायाधीश चंद्रचूड ठाकरे गटाच्या एका वकिलांवर भडकले.ठाकरे गटाच्या वतीने एका वकिलाने कोर्टाला म्हटलं की, या प्रकरणाला विलंब होतो आहे. तुम्ही लवकरात लवकर तारीख द्या. त्यावर चंद्रचूड म्हणाले की, तुम्ही आमच्या इथे येऊन बसा आणि तुम्हीच ठरवा. आम्ही एक-दोन आठवड्यात तारीख देऊ.

दरम्यान, अजित पवारांसह त्यांच्यासोबत गेलेल्या ४१ आमदारांना सुप्रीम कोर्टाने नोटीस बजावली होती. याप्रकरणी अजित पवारांनी कोर्टाकडे वेळ वाढवून मागितला आहे. त्यांच्या विनंतीनुसार सर्वोच्च न्यायालयाने अजित पवारांना तीन आठवड्यांचा वेळ दिला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -