Tuesday, May 13, 2025

देशमहत्वाची बातमी

शेख हसीना पुढील ४८ तासांत सोडणार भारत! अमेरिकेने रद्द केला व्हिसा, कोणत्या देशात जाणार शरण

शेख हसीना पुढील ४८ तासांत सोडणार भारत! अमेरिकेने रद्द केला व्हिसा, कोणत्या देशात जाणार शरण

नवी दिल्ली: बांगलादेशमधील हिंसाचारानंतर आपला देश सोडून भारतात आलेल्या माजी पंतप्रधान शेख हसीना पुढील ४८ तासांत युरोपला जाऊ शकतात. दरम्यान, युरोपातील कोणत्या देशात जाणार याबाबतची माहिती समोर आलेली नाही. याआधी त्या लंडनमध्ये जाणार असे बोलले जात होते. मात्र ब्रिटनने त्यांना देशात येण्याची परवानगी दिली नाही तर अमेरिकेने त्यांचा व्हिसाही रद्द केला आहे.


दरम्यान, त्या सध्या उत्तर प्रदेशातील गाझियाबाद स्थित हिंडन एअरबेसच्या एका सेफ हाऊसमध्ये आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार शेख हसीना युरोपातील कोणत्याही देशात जाऊ शकतात. सोबतच इतर देशांशीही चर्चा सुरू आहेत. चर्चा अशीही होत आहे की त्या रशियालाही शरण जाऊ शकतात.


यासोबतच हे ही म्हटले जात आहे की शेख हसीना यांना भारत पूर्णपणे सुरक्षा देईल आणि त्यांच्या जाण्याची व्यवस्थाही करेल. यामागचे कारण आहे की जे विमान शेख हसीना यांना भारतात सोडण्यास आले होते ते बांगलादेशच्या वायुसेनेचे होते आणि ते परतले आहे. अशातच आता त्या ज्या देशात जातील त्यांच्या जाण्याची व्यवस्था भारत करेल.



फिनलँड की रशिया? कुठे जाणार शेख हसीना


शेख हसीना यांच्या सुरक्षित बाहेर पडण्याची सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. सोमवारी संध्याकाळी भारतात पोहोचलेल्या हसीना फिनलँड आणि रशिया यांसारख्या देशांशी चर्चा करत आहेत.भारत त्यांच्या पुढील परदेशी प्रवासासाठी त्यांच्या सुरक्षेचीही व्यवस्था करेल. याआधी त्यांनी लंडन जाण्याचा निर्णय घेतला होता.

Comments
Add Comment