मुंबई: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ला सुरूवात होऊन साधारण १० दिवस झाले आहेत. भारताने आतापर्यंत ३ पदके जिंकली आहेत. अनेक स्पर्धा संपल्या आहेत. यातच चाहत्यांच्या मनात हा सवाल नक्कीच असेल की भारताचा दिग्गज नीरज चोप्राचा सामना कधी असणार आहे ते. नीरज चोप्रा भालाफेकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करेल. चाहत्यांना त्याचा सामना ६ ऑगस्टला पाहायला मिळेल.
नीरजला पाहण्यासाठी तुम्हाला ६ ऑगस्टला टीव्ही ऑन करावा लागेल. ग्रुप एचे क्वालिफिकेशन इव्हेंट दुपारी १.५० मिनिटांनी सुरू होतील. तर ग्रुप बीचे इव्हेंट त्याच दिवशी ३ वाजून २० मिनिटांनी सुरू होतील.
जर नीरज क्वालिफिकेनशन राऊंडमध्ये क्वालिफाय करतो तर ८ ऑगस्टला फायनलमध्ये तो परफॉर्म करू शकतो. हे फायनल राऊंड ८ ऑगस्टला ११ वाजून ५५ मिनिटांनी सुरू होतील. नीरज चोप्राशिवाय भारताकडून किशोर जेनाही भालाफेकमध्ये परफॉर्म करणार.
नीरज चोप्राशिवाय आज भारताचा हॉकी संघ अर्जेंटिनाविरुद्ध सेमीफायनलचा सामना खेळणार आहे. हा सामना रात्री १०.३० वाजता असेल.