मुंबई: आचार्य चाणक्य यांनी व्यक्तींच्या अशा काही गुणांचे वर्णन नीतिशास्त्रात केले आहे जे त्याला सफलतेच्या शिखरावर नेऊ शकतात.
आचार्य चाणक्य यांच्या मते या गुणांमुळे तो मनुष्य केवळ धनवानच होत नाही तर जीवनभर यश मिळवत असतो. आचार्य चाणक्य यांच्यानुसार ईमानदारी हा असा गुण आहे जो ज्या व्यक्तीमध्ये असतो ती व्यक्ती नेहमी प्रगती करत राहते.
चाणक्य म्हणतात की जी व्यक्ती आपली कामे ईमानदारीने करते त्यांना यश जरूर मिळते.
आचार्य चाणक्य यांच्या मते जी व्यक्ती आपल्या कामामध्ये इमानदार नसते त्या व्यक्तीला कधीही आपल्या कामात यश मिळत नाही. आचार्य चाणक्य यांच्यानुसार जी व्यक्ती मधुर भाषिक तसेच विन्रम असते त्या व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळते.
या व्यक्तींना फार कमी शत्रू असतात. विरोधकही यांच्या विन्रम स्वभावामुळे आपलेपणा जोपासतात.
आचार्य चाणक्य यांच्यानुसार जीवनात पैशांची बचत करणे गरजेचे आहे. पैशांची बचत करणारी व्यक्ती नेहमी आनंदी राहते.
ज्या व्यक्तीमध्ये हा गुण असतो त्या व्यक्तीला कधीही पैशांची कमतरता भासत नाही. त्या घरात नेहमी लक्ष्मी मातेचा वास असतो.