मुंबई: जिरे हा पदार्थ भारतीय मसाल्यातील महत्त्वाचा पदार्थ आहे. प्रत्येक भारतीय किचनमध्ये जिर आढळते. जिरे पदार्थात घातल्याने पदार्थाचा स्वाद वाढतो.
भाज्यांपासून ते पुलाव बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जिऱ्यापासून तुम्ही मॅजिकल ड्रिंक बनवू शकता. हे ड्रिंक तुम्हाला वेट लॉससाठी मदत करेल.
जिऱ्याचे पाणी एक हेल्दी ड्रिंक आहे जे सकाळी-सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने केवळ आपले शरीरच डिटॉक्सिफाय होत नाही तर वेट लॉसमध्येही फायदेशीर ठरते.
आज आम्ही तुम्हाला जिऱ्याच्या पाण्याचे काही फायदे सांगणार आहोत.
जिऱ्यामध्ये पॉलीफेनॉल्ससारखे अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. पॉलिफेनॉल्स अँटीऑक्सिडंट शरीराल डिटॉक्सिफाय करत इम्युनिटी बूस्ट करतात. यामुळे वेट लॉस होण्यास मदत होते.
एक चमचा जिऱ्यामध्ये केवळ ७ कॅलरीज असतात. अशातच हे जिरा वॉटर तुमच्यासाठी लो कॅलरी ऑप्शन ठरू शकते. याचे अनेक फायदेही आहेत.
जिऱ्याचे पाणी पाचनतंत्र स्वस्थ ठेवण्यास मदत करते. जिऱ्यामधील थायमोल गॅस्ट्रिक ग्लँड प्रोटीन, फॅट आणि शुगर तोडण्यास मदत करतात.
जिऱ्यामुळे मेटाबॉलिज्म वेगाने होते तसेच फॅट बर्निंगही वाढते. जिऱ्याचे पाणी पोटाची चरबी कमी करण्यास उपयुक्त ठरते. जर तुम्ही रेग्युलर एक्सरसाईजसोबत जिऱ्याचे पाणी घेतले तर बॉडी वेगाने कॅलरीज बर्न करण्यास मदत करते.