मुंबई: पॅरिस ऑलिम्पिक २०२४मध्ये भारतासाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे. भारताचे आणखी एक पदक निश्चित झाले. भारताची कुस्तीपटू विनेश फोगट ५० किलो वजनी गट फ्री स्टाईल प्रकारात अंतिम फेरीत दाखल झाली आहे. त्यामुळे भारताचे कमीत कमी रौप्यपदक निश्चित झाले आहे.
महिला कुस्ती ५० किलो वजनी गटात विनेशने क्युबाच्या युस्नेलिस गुजमानला ५-० असे हरवत फायनलमध्ये प्रवेश केला. सामन्याच्या सुरूवातीपासूनच विनेशचाच दबदबा होता. तिने क्युबाच्या खेळाडूला डोके वर काढायला संधीच दिली नाही. त्यामुळे विनेशचे कमीत कमी रौप्य पदक निश्चित झाले आहे.
विनेशचा अंतिम फेरीतील सामना बुधवारी रंगणार आहे. ऑलिम्पिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळणारी ती पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली आहे.