मुंबई: समस्या कधीही सांगून येत नाही. यासाठी नेहमी तयार राहिले पाहिजे. कोणती समस्या कधी येईल काही सांगू शकत नाही. याची तयारी तुम्ही इमरजन्सी फंड बनवून सुरू केली पाहिजे.
या फंडमुळे तुम्हाला कठीण काळात पैशांची गरज असल्यास ती भागवली जाऊ शकते. तुम्हाला त्यासाठी लोन घेण्याची अथवा कोणाकडे हात पसरण्याची गरज पडणार नाही.
इमरजन्सी फंड हा महिन्याच्या खर्चाच्या आधारावर ठरतो. याची रक्कम महिन्याच्या खर्चाच्या ६ पटींनी अधिक असली पाहिजे.
तुमचा महिन्याचा खर्च ५० हजार रूपये आहे तर या फंडची रक्कम ३ लाख रूपये असली पाहिजे. इमरजन्सी फंडचे पैसे कधीही सेव्हिंग अकाऊंटमध्ये ठेवू नका. याला लिक्विड फंडमध्ये ठेवल्याने जास्त व्याजही मिळेल.