मुंबई: हिमाचल प्रदेशात कॅन्सर पीडित रुग्णांसाठी चांगली बातमी आहे. सरकारे सर्व रुग्णांना मोफत उपचाराची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री सुखविंद्र सिंह सुक्खू यांनी ही घोषणा केली.
मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात कॅन्सर पीडित रूग्णांना मोफत औषधे दिली जातील तसेच त्यांच्यावरील उपचारही पूर्णपणे निशुल्क केला जाईल.
हिमाचल प्रदेश हे राज्य कॅन्सरच्या संख्येत दुसऱ्या स्थानावर आे. त्यामुळे या राज्यासाठी हा चिंतेचा विषय आहे. कॅन्सर रुग्णांना दिलासा देण्यासाठी सरकारने हा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. ते म्हणाले ही सुविधा विविध सरकारी रुग्णालयात दिली जाईल.
मीटिंगदरम्यान मुख्यमंत्री म्हणाले की, हिमाचल प्रदेश सरकार सरकारी रुग्णांलयातील कॅन्सर रुग्णांसाठी त्यांच्या उपचांरासाठी लागणारी ४० औषधे फ्रीमध्ये देईल.या औषधांना राज्याच्या अनिवार्य औषध यादीत समाविष्ट करण्यात आले आहे.