मुंबई: जुलै महिन्यात व्हेज भोजन करणाऱ्यांवर महागाईचा परिणाम झाला आहे. जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यात शाकाहारी भोजनाची थाळी ११ टक्क्यांनी महाग झाली. या वाढीमागे सगळ्यात मोठे योगदान टोमॅटोच्या वाढत्या किंमतीचे होते.जुलै महिन्यात जून महिन्याच्या तुलनेत नॉन व्हेज थाळीमध्येही ६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
टोमॅटोचे दर वाढल्याने व्हेज थाळी महागली
क्रिसिल मार्केट इंटेलिजेन्स अँड अॅनालिसिसने जुलै २०२४साठी आपल्या रोटी राईस रेट इंडेक्सच्या रिपोर्टमध्ये सांगितले की व्हेज थाळी जुलै महिन्यात ३२.६ रूपयांची झाली. जूनमध्ये हा दर २९.४ रूपये प्रति प्लेट इतका होता. व्हेज थाळीची सरासरी किंमत ११ टक्क्यांनी वाढली आहे.
व्हेज थाळीमध्ये भाज्यांमध्ये कांदा, टोमॅटो आणि बटाटाशिवाय भात, डाळ, दही आणि सलाडचा समावेश केला जातो. टोमॅटोच्या किंमती वाढल्याने व्हेज थाळी महागली. व्हेज थाळी महाग होण्यामध्ये ७ टक्के योगदान हे केवळ टोमॅटोच्या किंमतीमुळे झाले.
नॉनव्हेज थाळीही महागली
क्रिसिल रिपोर्टनुसार जुलै महिन्यात नॉन व्हेज थाळीही महागली. नॉन व्हेज थाळीच्या किंमतीत ६ टक्क्यांची वाढ झाली.