Friday, March 28, 2025
Homeताज्या घडामोडीAjit Pawar : अशक्य गोष्ट शक्य करणं हीच माझी ओळख!

Ajit Pawar : अशक्य गोष्ट शक्य करणं हीच माझी ओळख!

लाडकी बहीण योजनेवरुन टीका करणार्‍या विरोधकांना अजित पवारांचं चोख प्रत्युत्तर

मुंबई : राज्य सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात घोषित केलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ (Ladki bahin yojana) सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. या योजनेला राज्यभरातील महिलांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. मात्र, ही योजना केवळ निवडणुकीकरता आणली असून ती टिकणारी नाही असा सूर विरोधकांनी लावला आहे. यावर उपमुख्यमंत्री आणी अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी एक्स अकाऊंटवर एक पोस्ट करत विरोधकांना चांगलंच धारेवर धरलं आहे. ‘अशक्य गोष्ट शक्य करणं हीच माझी ओळख आहे’, असं म्हणत अजित पवारांनी या योजनेला अधिकाधिक निधी मिळवून देऊ, असं आश्वासन दिलं आहे.

अजित पवारांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ”माझी लाडकी बहीण योजना’ टिकवणं शक्य नसल्याचं विरोधी पक्ष सांगत आहेत. परंतु अशक्य गोष्ट शक्य करणं हीच माझी ओळख आहे. तोच माझा स्वाभिमान आहे. ही कल्याणकारी योजना विरोधकांना बंद पाडायची आहे, तसं त्यांनी स्पष्ट देखील केलं आहे कारण, ही योजना यशस्वीपणे राबवणं अशक्य आहे असं त्यांचे भाकित आहे. परंतु येत्या काळात या योजनेला अधिक बळकटी देवून या योजनेची रक्कम वाढवण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. ही निवडणूक महिलांच्या हितासाठी आणि विरोधात असणाऱ्यांमध्ये आहे’, असं म्हणत अजितदादांनी विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

योजनेचा अर्ज करण्यासाठीही केली मुदतवाढ

महाराष्ट्र सरकारच्या वतीने लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी ३१ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली होती. राज्यभरातील महिलांची गर्दी पाहता आता सरकारने या योजनेचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. ज्या-ज्या महिलांनी अद्याप या योजनेसाठी अर्ज दाखल केला नाही, त्यांना ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -