पाटणा: बिहारच्या हाजीपूर येथे करंट लागल्याने ९ कावड यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. यात एक अल्पवयीनाचा समावेश आहे. ही घटना रविवारी रात्री उशिरा घडली. ११ हजार वोल्टच्या तारेचा स्पर्श डीजेला झाला. आग लागताच डीजे ट्रॉली जळाली. ही संपूर्ण घटना हाजीपूरच्या औद्योगिक ठाणे क्षेत्रातील सुल्तानपूर येथे घडली. घटनास्थळी जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस, अॅम्ब्युलन्स आणि फायर ब्रिगेडची टीम पोहोचली.
घटनेसंबंधित समोर आलेल्या माहितीनुसार हे सर्व कावड यात्रेकरू पहलेजा घाटातून गंगाजल घेऊन बाबा हरिहरनाथ मंदिरात जाणार होते. श्रावण महि
हरिहरनाथ मंदिरात जाऊन कऱणार होते जलाभिषेक
न्यातील तिसऱ्या सोमवारी जलाभिषेक करणार होते. दरम्यान, रस्त्यातच ही घटना घडली. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास हे लोक निघणारच होते. त्याचवेळेस ११ हजार वोल्ट तारेचा स्पर्श डीजेला झाला. या घटनेत अनेक जण जखमीही झाले. जखमी झालेल्यांना हाजीपूर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व मृत व्यक्तींची ओळख पटवण्यात आली आहे.
या घटनेतील सर्व मृत व्यक्ती हाजीपूर औद्योगिक ठाणे क्षेत्रातील सुल्तानपूर गावात राहणारे होते. सुल्तानपूर गावातून डीजे ट्रॉली घेऊन कावड यात्रेकरूंचा ग्रुप निघाला होता. या घटनेनंतर गावात संपूर्ण शोककळा पसरली आहे.