Monday, May 19, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

Home Loan क्लोज केल्यानंतर जरूर घ्या या ३ गोष्टी

Home Loan क्लोज केल्यानंतर जरूर घ्या या ३ गोष्टी

meमुंबई: अनेकदा लोक घर खरेदी करण्यासाठी होम लोन घेतात. होम लोन घेण्याच्या वेळेस त्यांना काही कागदपत्रे कर्जासाठी अर्ज करताना तसेच रजिस्ट्रेशनच्या वेळेस सबमिट करावी लागतात. मात्र जेव्हा आपण कर्ज पूर्ण भरतो. त्यानंतर काही कागदपत्रे ही परत घेणे गरजेचे असते. यात तीन कादगदपत्रे अतिशय महत्त्वाची आहेत. ही जर तुम्ही वेळेत परत घेतली नाहीत तर तुमची समस्या वाढू शकते.


यातील महत्त्वाचे कागदपत्र आहे ते म्हणजे एनओसी. कर्ज चुकवल्यानंतर तुम्हाला बँकेकडून नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट मिळवावे लागते. यामुळे हे निश्चित होते की बँकेचे तुमच्यावर आता कोणतेही कर्ज नाही.


जी NOC तुम्ही मिळवत असाल तर हे ही जरूर चेक करा की त्यात तुमचे नाव, लोन बंद झाल्याची तारीख, संपत्तीचे संपूर्ण डिटेल्स, लोन अकाऊंट नंबर आणि इतर गोष्टी व्यवस्थित आहेत की नाही.


त्यानंतर रजिस्टार ऑफिसमधून एन्कम्ब्रेंस सर्टिफिकेट घ्यावे लागते. एन्कम्ब्रेंस सर्टिफिकेटने हे सिद्ध होते की तुमच्या संपत्तीवर आता कोणतेही Dues बाकी नाही आहे. तसेच जर तुम्हाला भविष्यात संपत्ती विकायची असेल तर एन्कम्ब्रेंस सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे. यासाठी हे तुम्हाला मिळवावेच लागेल.


याशिवाय पझेशन पेपरसोबत प्रॉपर्टी आणि इतर कागदपत्रेही मिळवणे तितकेच गरजेचे आहे.

Comments
Add Comment