आदित्य ची नार्को टेस्ट करा, सुशांत सिंग, दिशा सालीयन मृत्यूचे सत्य बाहेर येईल
कणकवली : चांगल्या आंब्याच्या पेटीत सडका आंबा ठेवला तर सगळेच आंबे खराब होऊन जातात. राजकारणातील संजय राऊत हा अशाच पद्धतीचा सडका आंबा आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षे मुख्यमंत्री म्हणून यशस्वी काम केले. आता कार्यतत्पर उपमुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत. २०१४ आणि २०१९मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली १००पेक्षा जास्त आमदार भारतीय जनता पार्टीचे निवडून आणले. संजय राऊत यांचा मालक उद्धव ठाकरे यांना ७० आमदार सुद्धा निवडून आणता आलेले नाही. त्यामुळे राजकारणातील सडका आंबा असलेल्या संजय राऊत याची समाजाभिमुख काम करणाऱ्या महाराष्ट्राचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्याची लायकी नाही, अशा शब्दात खरपूस समाचार भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी खा. संजय राऊत यांचा घेतला.
प्रहार भवन येथे आयोजित इलेक्ट्रॉनिक माध्यमांशी बोलताना, आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उबाठा खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यांचा समाचार घेतला. यावेळी भाजप प्रवक्ते, आमदार नितेश राणे म्हणाले. उपमुख्यमंत्री फडणवीस त्यांच्यावर टीका करण्यापूर्वी त्यांचे कार्य पहा. विरोधी पक्षनेते असताना राउत यांच्या मालकाला एक दिवस झोपायला दिले नाही. एवढे काम त्यांनी विरोधी पक्ष नेता म्हणून केले. त्यामुळे टीका करून उपमा देण्याचे काम सडका आंबाच करू शकतो,अशी टीका आमदार राणेंनी केली.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सभागृहात फडणवीस यांनी आरोप केले होते.तेव्हा सचिन वाझे वर कारवाई करायला तो लादेन आहे का? असे उद्धव ठाकरे यांनी उत्तर देत, कोणतीच कारवाई केली नव्हती. यांच्या घरातली भांडण बाहेर येत आहेत. सचिन वाझेला कोण कुठे घेऊन फिरायचा त्याचे पुरावे मला दाखवावे लागतील. दरम्यान, संजय राउत हे आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करण्याची हिम्मत दाखवेल का? दिशा सालियन आणि सुशांत सिंग प्रकरणात आदित्यची नार्को टेस्ट झाली पाहिजे. सचिन वाजेचा वापर करून कशा पद्धतीने पुरावे नष्ट केले हे समोर अशी मागणी यावेळी आमदार नितेश राणे यांनी केली.