Sunday, May 11, 2025

क्रीडाताज्या घडामोडी

Paris Olympic 2024: भारताला मिळणार चौथे पदक? पाहा आजचे भारताचे वेळापत्रक

Paris Olympic 2024: भारताला मिळणार चौथे पदक? पाहा आजचे भारताचे वेळापत्रक

मुंबई: खेळांचा महाकुंभ मानल्या जाणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत आज ५ ऑगस्टला भारताला चौथे पदक मिळू शकते. हे पदक कांस्यपदक ठरू शकते. लक्ष्य सेन आज भारताला पदक मिळवून देऊ शकतो.


लक्ष्य सेनचा कांस्यपदकासाठीचा सामना आज संध्याकाळी सहा वाजता रंगत आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत तीन पदके जिंकली आहे. ही सर्व पदके कांस्यपदके असून नेमबाजीत भारताने मिळवली आहे.


सगळ्यात आधी मनू भाकरने १० मीटर एअर पिस्टोल प्रकारात कांस्यपदक पटकावले. त्यानंतर दुसरे कांस्यपदक मनू भाकरने मिश्र प्रकारात पटकावले. तिच्यासोबत सरबजोत सिंहही संघात होता. तिसरे कांस्यपदक भारताच्या स्वप्नील कुसळेने नेमबाजी ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये मिळवून दिले.



नेमबाजी


स्कीट मिश्र संघ(क्वालिफिकेशन)- महेश्वरी चौहान आणि अनंतजीत सिंह नरूका- दुपारी साडेबारा वाजता



टेबल टेनिस


महिला संघ(प्री क्वार्टर फायनल) - भारत वि रोमानिया दुपारी १.३० वाजता



अॅथलेटिक्स


महिला ४०० मीटर (किरण पहल)हीट पाच - दुपारी ३.५७ वाजता
पुरुष ३००० मीटर स्टीपलचेस, अविनाश साबळे हीट दोन- रात्री १०.५० वाजता



बॅडमिंटन


पुरूष एकेरी(कांस्यपदक सामना) लक्ष्य सेन विरुद्ध ली जी जिया(मलेशिया) संध्याकाळी ६ वाजता

Comments
Add Comment