मुंबई: महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर भंडारी समाज मोठ्या संख्येने वसलेला आहे. भंडारी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी समाज एकत्र करणे काळाची गरज आहे. समाजाची शैक्षणीक, सामाजिक आर्थिक आणि राजकीय उन्नती साधायची असेल तर एकत्र येऊन भंडारी भविष्याचा वेध घेणे क्रमप्राप्त आहे.
कोकणात पालघर , ठाणे , मुंबई, रायगड , रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा तसेच पुणे नांदेड या ठिकाणी भंडारी समाज वास्तव्यास आहे . अनेक मंडळांच्या माध्यमातून भंडारी समाजाचे सामाजिक कार्य चालू आहे. या सर्व मंडळाना एकत्र करून रविवार दिनांक २५ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १०:०० ते ५:०० यावेळेत सावरकर नाट्यगृह रत्नागिरी येथे अधिवेशन आयोजीत करण्यात आले आहे.
शैक्षणिक , सामाजिक, आर्थिक, व्यावसायिक विषयांवर चर्चासत्र होवून त्यामध्ये समाजहिताचे काही ठराव संमत केले जाणार आहेत. यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक , गोव्याचे माजी मुख्यमंत्री रवी नाईक, भंडारी नेते अनिल होबळे, माजी मंत्री कालिदास कोळंबकर, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ सुहास पेडणेकर, भंडारी समाज नेते नवीनचंद्र बांदिवडेकर, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आशिष पेडणेकर, पत्रकार राजेश कोचरेकर, बिपीन मयेकर , सुभाष मयेकर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाचे नियोजन रत्नागिरी भंडारी समाजाच्या माध्यमातून केले जाणार आहे