मुंबई: जुलै महिन्यात भारतात प्रायव्हेट टेलिकॉम कंपन्यांनी प्रीपेड आणि पोस्टपेड रिचार्ज प्लान्सच्या किंमतीत वाढ करत संपूर्ण देशभरातली युजर्सला मोठा झटका दिला होता. एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया याशिवाय जिओ कंपनीनेही आपल्या नव्या प्लान्सच्या किंमतीत २५ टक्क्यांपर्यंत वाढ केली होती. आता जिओने आपल्या युजर्सला महागड्या प्लान्सपासून दिलासा देण्यासाठी नवा प्लान सादर केला आहे.
जिओचा स्वस्त प्लान
हा प्लान केवळ युजर्सला कमी किंमतीत मिळणार नाही तर यात युजर्सला अधिक व्हॅलिडिटी मिळेल. जिओच्याया रिचार्ज प्लानची किंमत १८९९ रूपये आहे. व्हॅल्यू सेक्शनमधील जिओच्या या प्लानमध्ये युजर्सला ३३६ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. याचा अर्थ आहे की १८९९ रूपयांच्या या प्लानमध्ये तुम्हाला ११ महिने रिचार्ज करण्याचे नो टेन्शन.
जिओने आपल्या या नव्या प्लानसोबत युजर्सला कोणत्याही नेटवर्कवर ३३६ दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग आणि एकूण ३६० एसएमएसची सुविधा देते. इतकंच नव्हे तर या प्लानसोबत जिओच्या युजर्सला २४ जीबी इंटरनेट डेटा मिळतो. जर तुम्ही जास्त इंटरनेट डेटा वापरत नसाल तर हा प्लान तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.
यानुसार तुम्हाला दर महिन्याला हा प्लान १७२ रूपयांना पडू शकतो. जे खूप नेट वापरत नाहीत त्यांच्यासाठी ही चांगली डील ठरू शकते.