लखनऊ: उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये दहा वर्षाच्या एकुलत्या एका मुलाच्या मृत्यूनंतरही त्याच्या आईने माणुसकीचे दर्शन घडवले आहे. महिलेने त्या ११ वर्षाच्या मुलाला माफ केले ज्याच्यामुळे तिच्या काळजाचा तुकडा तिने गमावला होता.
कानपूरमध्ये क्रिकेट खेळत असताना नो बॉलवरून मुलांमध्ये वाद झाला. यावेळेस चिडलेल्या मुलाने रागाच्या भरात त्या महिलेच्या मुलाला बॅटने मारले. यात त्या मुलाचा मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूनंतर त्याच्या आईला दुसऱ्या मुलाच्या विरोधात पोलिसांकडे केस दाखल करण्याचा सल्ला दिला मात्र तिने असे केले नाही.
खेळात वाद हे होतातच
आरोपी मुलाच्या आईच्या वेदना समजून घेत मृत मुलाच्या आईने आरोपीविरुद्ध रिपोर्ट लिहिण्यास नकार दिला. ती म्हणाली खेळताना वादविवाद तर होतातच त्या मुलाने जाणून बुजून माझ्या मुलाला मारले नव्हते.
ही संपूर्ण घटना रविवार सकाळची आहे. जाजमऊ परिसरात केडीए कॉलनीमध्ये राहणारा १० वर्षांचा आरिज आपल्या परिसरातील मित्रांसोबत एकता पार्कमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता. तो बॉलिंग करत होता तर दुसरा मुलगा बॅटिंग करत होता. यावेळेस नो बॉलवरू त्यांच्यात वाद झाला. यावेळेस बॅटिंग कऱणाऱ्या ११ वर्षाच्या ुलाने आरिजला बॅटने मारले. त्याने इतके जोरात मारले की आरिज बेशुद्ध झाला. आरिजला रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला तेथे मृत घोषित केले.