साप्ताहिक राशिभविष्य, ४ ते १० ऑगस्ट २०२४
![]() |
लाभात वाढ होईलमेष : प्रगतीत वाढ होण्यासाठी प्रयत्नशल राहाल; परंतु जास्त कष्टाची आवश्यकता भासेल. निरनिराळ्या सोयी-सुविधा उपलब्ध होतील. नातेवाईक, आप्तेष्ट यांच्याशी संबंध सुधारतील. मित्र मंडळ यांच्या वर्तुळात प्रिय व्हाल. हितशत्रू व गुप्त शत्रूंचा पराभव करणे शक्य होईल. जवळच्या लोकांचे सहकार्य प्राप्त होईल. आपल्या वर्तनाने किंवा बोलण्याने इतर व्यक्ती दुखावणार नाही अथवा दुरावणार नाहीत याची काळजी घेणे क्रमप्राप्त ठरेल. जवळचे तसेच लांबचे प्रवास यशस्वी होतील. प्रगती व उन्नतीवर जास्त जोर वाढेल. भौतिक लाभात वाढ होईल. प्रलंबित राहिलेली एखादी इच्छा पूर्ण होईल. |
![]() |
उत्पन्नात वाढ होईलवृषभ : दीर्घकालीन रखडलेली अथवा प्रलंबित असलेली कामे मार्गी लागून पूर्णत्वाकडे प्रवास करतील. विशेषतः जमीन जुमला, स्थावर मिळकत, वडिलोपार्जित संपत्ती याविषयी असलेले प्रश्न मार्गी लागतील. धनलाभाचे योग. राहत्या घराविषयीचा प्रश्न सुटेल. बरेच दिवस उराशी बाळगलेले स्वतःच्या मालकीच्या घराचे स्वप्न पूर्ण होईल. मात्र त्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत. तरुण-तरुणी आपल्या कारकिर्दीस एक वेगळे रूप देऊ शकतील. नवीन नवीन संधींचा लाभ मिळेल. त्या संधीचे सोने करणे आपल्याच हातात आहे. खेळाडू व कलाकार यांना नवीन नवीन लाभ मिळेल. त्याचप्रमाणे उत्पन्नात वाढ होईल. प्रसिद्धी मिळेल. |
![]() |
नव्या ओळखीतून फायदामिथुन : नवीन निर्णय घेण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण होऊन आपण धाडसी निर्णय घ्याल. पुढील भविष्यात ते फायदेशीर ठरतील. व्यवसायात किंवा घरगुती कामातसुद्धा प्रसार माध्यमांचा चांगला उपयोग होईल. व्यवसायिक नव्या ओळखीतून फायदा संभवतो. नव्या ओळखी होऊन नवीन व्यावसायिक अनुबंध जुळतील. व्यवसायात प्रगती करण्याच्या संधी मिळतील. कामानिमित्त जवळचे तसेच लांबचे प्रवास घडतील. कुटुंबातील मुलींकडून चांगल्या बातम्या येतील. मित्रमंडळीत व कुटुंबात आपला वेळ आनंदात व्यतीत होईल. उत्पन्न वाढेल. आर्थिक परिस्थिती सुधारेल. सामाजिक कार्यात रस घ्यावासा वाटेल. |
![]() |
मार्गदर्शन मिळेलकर्क : नोकरी, व्यवसाय धंदा यामधून काहीवेळेस अनपेक्षित फायदे मिळाल्यामुळे आश्चर्यचकित होण्याची वेळ येईल. आपल्या कार्यक्षेत्राची कक्षा रुंदावेल. समाजातील प्रतिष्ठित अथवा मोठ्या व्यक्तींचे आपल्याला सहकार्य लाभून त्यांच्या सहवासात राहता येईल. मार्गदर्शन मिळेल. व्यावसायिक प्रगती होईल. समाजातील आपल्या प्रतिमेबाबत जागृत राहाल. त्याचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न कराल. त्यासाठी वेळ, पैसा, खर्च करण्याची प्रवृत्ती बळावेल. मानसिक स्तर उंचावलेला असल्यामुळे आपण उत्साही आणि आनंदी राहाल. कार्यमग्न राहून व्यवसाय तसेच कौटुंबिक विषयात व्यग्र राहाल. |
![]() |
सफलता मिळेलसिंह : आपली बरीचशी कामे मार्गस्थ होतील. मागील काही दिवसात ताणतणाव निर्माण झाला होता तो आता निवळेल. त्यापासून मुक्तता. तरुण- तरुणींना स्पर्धा परीक्षेतून चांगले यश मिळेल. नोकरीसाठी अथवा अन्य कारणांसाठी दिलेल्या मुलाखती यशस्वी ठरून कामे होतील. आपल्या आवडत्या क्षेत्रात काम करण्याची संधी उपलब्ध होईल. आपल्या कार्यात काही अडथळे येणार असल्याचे जाणवेल. अशा वेळेस काहीशा गुप्ततेने आपण कृती कराल व त्यात सफलता ही मिळेल. |
![]() |
उत्कर्ष होईलकन्या : कामात सुसहाय्यता येणार आहे. सकारात्मकतेमध्ये वृद्धी होऊन अनुकूल परिणाम मिळतील. लहान-मोठी कामे विनासायास पार पडतील. आपले बुद्धिचातुर्य व आत्मविश्वास, अंदाज यामध्ये द्वंद राहील. यावेळेस आपण आपल्यावरील नियंत्रण घालवू नका. आपण घेतलेले निर्णय योग्य ठरतील. त्यामुळे भाग्याचे संकेतच मिळतील. वैवाहिक जीवनात आनंद मिळेल. पती अथवा पत्नीचा भाग्योदय होऊन उत्कर्ष होईल. व्यवसाय धंद्यात उत्कर्ष अथवा प्रगती करु शकाल. |
![]() |
गाठीभेटी सफल होतीलतूळ : प्रिय व्यक्तीची चिंता संपुष्टात येईल. कोर्टविषयक समस्या संपतील. दीर्घकालीन रखडलेले अथवा वादग्रस्त असलेले प्रश्न सुटतील. कुटुंब परिवारात शुभवार्ता मिळतील. नोकरीविषयक कामे होतील. व्यवसाय धंद्यातील परिस्थिती समाधानकारक राहील. विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून सदरचा कालावधी अनुकूल आहे. अभ्यासाकडे लक्ष केंद्रित केल्यास अपेक्षित यश सहज मिळवता येईल. भौतिक लाभात वाढ होईल. भागीदारीच्या व्यवसायात विशेष फायदा संभवतो. मान्यवरांच्या गाठीभेटी सफल होऊन कामे मार्गी लागतील. वैवाहिक सुख मिळेल. |
![]() |
जुनी येणी येतीलवृश्चिक : व्यवसाय धंद्यामधील उधारी वसूल होईल. जुनी येणी येतील; परंतु ही वसुली होताना शांतपणे संवाद साधण्याची गरज आहे. व्यवसाय धंद्यामध्ये कामगारांचे प्रश्न अचानक समोर येऊ शकतात. त्यांच्या प्रश्नांकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. तसेच यंत्रसामग्रीच्या देखभालीच्या खर्चावर जास्तीचा खर्च करावा लागेल. सरकारी स्वरूपाचे काम मार्गी लागू शकेल. त्यामध्ये आपल्याला इतरांची मदत मिळू शकते; परंतु कोणत्याही कामात जास्त जोखीम घेणे टाळलेले बरे. विद्यार्थ्यांनी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. |
![]() |
समाधान व आनंद होईलधनु : दीर्घकालीन रखडलेली जमीन जुमला, स्थावर मिळकत याबाबतची कामे गतिमान होऊन मार्गी लागतील. एखादे महत्त्वाचे काम होईल. कोर्टकचेरीतील कामे आपल्या मनाप्रमाणे झाल्यामुळे आपल्याला समाधान व आनंद होईल. कुटुंबातील तरुण-तरुणींचे प्रश्न अथवा समस्या संपुष्टात येतील. नोकरीविषयक कामे होतील. बेरोजगारांना रोजगार मिळेल. पूर्वी दिलेल्या नोकरीविषयक मुलाखतीतून नोकरीसाठी बोलावणे येऊ शकते. आरोग्य सुधारेल. प्रवासाचे योग. |
![]() |
सुखद घटना घडतीलमकर : आपल्या जीवनात काही सकारात्मक बदल झाल्यामुळे आपला दिनक्रमसुद्धा बदलेल. काही सुखद घटना घडतील. त्यामुळे आपले जीवन बदलून जाईल. व्यवसाय धंद्यातील परिस्थिती समाधानकारक राहून नफ्याच्या प्रमाणात वाढ झालेली अनुभवता येईल. व्यवसाय विस्ताराच्या योजना करू शकाल. पूर्वी केलेले नियोजन सफल होईल. इतरांच्या मागण्यांना प्राधान्य दिले ते आपल्या हिताचे ठरू शकते. विशेषतः भागीदारीच्या व्यवसायांमध्ये भागीदाराच्या म्हणण्याला, मताला उचित प्राधान्य द्या. नोकरीमध्ये अपेक्षित घटना घडून पदोन्नती वेतन वृद्धीसारख्या घटना घडतील. |
![]() |
ओळखी-मध्यस्थी यशस्वी होतीलकुंभ : आजपर्यंत एखादे महत्त्वाचे काम जे रखडलेले होते किंवा आपण त्यांना कामाची पूर्ण होण्याची वाट बघत होता अशा स्वरूपाचे कार्य अचानक पूर्ण झाल्यामुळे आश्चर्य वाटेल. दीर्घकाळ प्रलंबित असलेले स्थावर मालमत्तेचे व्यवहार तसेच जमीनजुमला संबंधित व्यवहार, ओळखी मध्यस्थीमुळे गतीमान होतील. आर्थिक फायदा मिळू शकतो. काहींना वास्तुयोग. आपल्या स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण होऊ शकते; परंतु त्यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. प्रयत्न सफल होतील. तसेच आर्थिक सहाय्य मिळेल. कुटुंब परिवारात आपल्या जीवन साथीचे सहकार्य आपल्याला मिळत राहील. धनलाभाचे योग. |
![]() |
कामाचे चीज होईलमीन : अनेकानेक नवीन संधी मिळतील. आपले कर्तृत्व सिद्ध करता येईल. परदेशगमन होऊ शकते. भाग्योदय होईल. मानसन्मान प्राप्त होऊन अर्थार्जन वाढेल. आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. सरकारी स्वरूपाची मदत सुद्धा मिळू शकते. नोकरीमध्ये बढतीचे योग आहेत. पदोन्नती, वेतन वृद्धी मिळू शकते. आपण पूर्वी केलेल्या कामाचे चीज होईल. वरिष्ठांशी संबंध चांगले राहतील. त्याचप्रमाणे हाताखालील सहकाऱ्यांचे सहकार्य मिळू शकते. मात्र बदलीची शक्यता. कामाच्या स्वरूपात बदल होऊन स्थान बदलसुद्धा होऊ शकतो. नवीन आव्हाने स्वीकारा. व्यवसाय तसेच नोकरीतसुद्धा नवीन अनेक उत्तम पर्याय आपल्यासमोर येतील. |