Wednesday, September 17, 2025

Shravani Somvar 2024 : उद्या पहिला श्रावणी सोमवार; ७२ वर्षांनंतर जुळून आला शुभ संयोग!

Shravani Somvar 2024 : उद्या पहिला श्रावणी सोमवार; ७२ वर्षांनंतर जुळून आला शुभ संयोग!

'अशी' करा महादेवाची पूजा; जाणून घ्या तिथी, मुहूर्त आणि पूजाविधी

मुंबई : हिंदू धर्मात श्रावण (Shravan 2024) हा सर्वात महत्त्वाचा महिना मानला जातो. त्यामुळे अनेकजण या श्रावणाची आतुरतेने वाट पाहत असतात. भगवान शंकराला श्रावण महिना फार प्रिय आहे. त्यामुळेच या महिन्याचे महत्त्व आहे. हा महिना भगवान शंकराला समर्पित असल्यामुळे अनेकजण यादरम्यान व्रत-वैकल्ये, उपवास करतात. दरम्यान, उत्तर भारतीयांच्या श्रावण महिन्याला सुरुवात झाली असून उद्यापासून महाराष्ट्रातही श्रावणाची सुरुवात होणार (Shravani Somvar) आहे. यंदाच्या श्रावणात एक शुभ संयोग जूळून आल्यामुळे हा श्रावण विशेष मानला जाणार आहे. जाणून घ्या यामागचे कारण तसेच महादेवाची पूजा करण्याची पूजाविधी, तिथी, मुहूर्त याबाबतची माहिती.

७२ वर्षांनी आलेला योगायोग कोणता?

यंदा श्रावणाची सुरुवात सोमवारपासून होणे शुभ मानले जात आहे. तसेच श्रावण समाप्तीही सोमवारीच होणार आहे. त्याचबरोबर यंदाच्या श्रावणात पाच सोमवार आले आहेत. ५ सोमवारांचा योगायोग तब्बल १८ वर्षांनंतर जुळून आला आहे. त्यामुळे हेदेखील एक वैशिष्टय मानले जात आहे. यामुळे यंदाचा श्रावण आपल्याला विशेष फलप्राप्ती करुन देणार आहे.

पहिल्या सोमवारी या मुहूर्तावर करा शंकरांची पूजा

• अमृत मुहूर्त - सकाळी ५ वाजून ३७ मिनिटांपासून सकाळी ७ वाजून २० मिनिटांपर्यंत • शुभ मुहूर्त - सकाळी ९ वाजून २ मिनिटांपासून सकाळी १० वाजून ४५ मिनिटांपर्यंत • सायंकाळी पूजेचा मुहूर्त - ५ वाजून ३५ मिनिटांपासून रात्री ८ वाजून ३५ मिनिटांपर्यंत

अशी करा महादेवांची पूजा

श्रावणातील प्रत्येक सोमवारी उपवास करा. सकाळी उठून स्नानादी कामे आटोपून देवासमोर बसा. शिवलिंगाला समोर घेऊन त्यावर जल आणि बेलपात्र वहा. त्यानंतर शिवलिंगाला फळं, पांढऱ्या रंगाची फुले वाहा.

त्यानंतर शिवलिंगाला अगरबत्ती आणि कर्पूरारती करा. त्यानंतर शांत मनाने हात जोडून शिव मंत्राचा जप करा. पूजेनंतर दिवसभर उपवास करून फराळ करा.

पूजे दरम्यान करा या शिव मंत्रांचा जप

ॐ नमः शिवाय ॥ ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात्॥ ॐ नमो भगवते रूद्राय। ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि। तन्नो रुद्रः प्रचोदयात् ॥

Comments
Add Comment