Sunday, March 16, 2025
Homeसाप्ताहिककिलबिलकडधान्यांची गोष्ट : कविता आणि काव्यकोडी

कडधान्यांची गोष्ट : कविता आणि काव्यकोडी

मोड आलेल्या कडधान्यांची
गोष्ट सांगते आई
कडधान्यांच्या उसळीबद्दल
सांगते बरंच काही

तोंडाला चव नसेल तर
म्हणते एक गोष्ट करावी
चमचमीत उसळीची चव
एकदा तरी घ्यावी

मोड आलेली कडधान्ये
पचायला असतात हलकी
चवीलासुद्धा मस्त म्हणे
आहारात हवीत नेमकी

वाल, हरभरा, मूग, मटकी
हुलगा, वाटाणा, मसूर
तूर, घेवडा, चवळी, उडीद
कडधान्ये आहेत भरपूर

मुबलक त्यात प्रोटिन्स
जीवनसत्त्वेही खूप
पचनक्रिया सुधारून
बाळसे धरते रूप

मोड आल्यावर त्यांना
ती आणखी उपयोगी होती
उत्तम तब्बेतीसाठी
आरोग्यदायी ती ठरती

आई नुसते बोलत नाही
साऱ्यांसाठी करते किती
कडधान्यांच्या केवढ्या
तिला येतात पाककृती

काव्यकोडी – एकनाथ आव्हाड

१) डोंगरावरील खडकातून
जन्माला आली
गुळगुळीत, सुंदर
काळी काळी झाली
श्रीगणेशा तिच्यावरच
काढला जाई
कोण बरं अ आ ई
गिरवून घेई?

२) शेतात राबतात
शेतकरी
तेव्हाच येतात ते
भूमीवरी

पिवळ्याधम्मक दाण्यांनी
खूप खूप हसतात
हिरव्या कपड्यात
दडून कोण बसतात?

३) इवलीशी साधीशी
तरी मोठी कामाची
अंधाराला पळवी
जरी असे मातीची

तेज नवे उधळण्याचे
सदा तिचे काम
आळसात बुडून कोण
करीत नाही आराम?

उत्तर –

१) पाटी
२) कणीस
३) पणती

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -