Wayanad Landslide : वायनाड भूस्खलनातील मृतांचा आकडा ३५७ वर!

Share

२०६ जण अजूनही बेपत्ता

वायनाड : राज्यासह देशभरात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. देशात काही ठिकाणी तर मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. त्यातच केरळमधील (Keral) वायनाडमध्ये (Wayanad) झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठी दुर्घटना घडली आहे. भूस्खलन होऊन अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. २९ जुलै रोजी रात्री उशिरा केरळमधील वायनाड येथे जमीन खचली. या भूस्खलनामध्ये मुंडक्कई, चूरलमाला, अट्टामाला आणि नूलपुझा ही चार गावं मातीच्या ढिगाऱ्याखाली दबली गेली. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आतापर्यंत या दुर्घटनेत ३५७ जणांचा मृत्यू झाला आहे.

एनडीआरएफ, लष्कराचे जवान, स्थानिक प्रशासन यांच्याकडून बचावकार्य वेगाने सुरू आहे. आतापर्यंत सापडलेल्या सर्व मृतदेहांचे पोस्टमॉर्टम करण्यात आले आहे. यामधील २१८ मृतांची ओळख पटली आहे. तर १४३ जणांच्या मृतदेहाचे फक्त तुकडे मिळाले आहेत. तर वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असलेल्या ५१८ जणांपैकी २०९ जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. सतत पडणारा पाऊस आणि चिखल यामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण झाले आहेत.

मुख्यमंत्री विजयन यांनी दिलेल्या माहितीनुसार, वायनाडमध्ये शोध आणि बचाव कार्य शेवटच्या टप्प्यात आहे. परंतु अद्याप २०६ जण बेपत्ता आहेत. लष्कराचे जवान, एनडीआरएफची टीम, वन विभागाचे कर्मचारी, पोलीस, निमलष्करी दल आणि स्वयंसेवकांसह १४०० हून अधिक जण मदतकार्यात गुंतले आहेत. नागरिकांचे नातेवाईक त्यांना शोधण्यासाठी घटनास्थळी बसून आहेत. ते देखील या मदत आणि बचावकार्यामध्ये मदत करत आहेत.

लष्कराने १ ऑगस्ट रोजी मुंडक्काई, चुरलमाला, अट्टामाला आणि नूलपुझा गावात बचाव कार्य संपल्याची माहिती दिली होती. आता केवळ ढिगाऱ्याखाली दबलेले मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे. अनेक ठिकाणी ढिगाऱ्याखाली २० ते ३० फूट खाली मृतदेह दबले गेल्याची शक्यता आहे.

कर्नाटक सरकार भूस्खलनग्रस्तांसाठी १०० घरे बांधणार

वायनाड भूस्खलनाच्या घटनेला ६ दिवस झाले. सहाव्या दिवशी शोधकार्य सुरू आहे. केरळमध्ये आजही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोझिकोड, वायनाड, कन्नूर आणि कासारगोड जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी घोषणा केली की, त्यांचे सरकार वायनाडमध्ये भूस्खलनग्रस्तांसाठी १०० घरे बांधणार आहे. राज्य सरकार आणि इतर पथकांसह पीडितांना मदत केली जात आहे.

Recent Posts

UPSC CSE Result : ‘यूपीएससी’चा निकाल जाहीर! महाराष्ट्राचा अर्चित डोंगरेने मारली बाजी

नवी दिल्ली : देशातील सर्वात स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या UPSC CSE मध्ये दरवर्षी…

8 minutes ago

लँड स्कॅमचा बादशाह उद्धव! आशिष शेलारांचा थेट घणाघात

मुंबई : 'मुंबईतील लँड स्कॅमचा बादशाह जर कोणी असेल, तर तो उद्धव ठाकरेच!' अशा शब्दांत…

9 minutes ago

Heart Attack: गेल्या काही वर्षांत हृदयविकाराच्या घटनांमध्ये वाढ का झाली आहे? अभ्यासात मोठा खुलासा

कोविड महामारी दरम्यान संसर्ग झालेल्या लोकांना हृदयरोगांचा धोका सर्वाधिक मुंबई: गेल्या वर्षातील आकडेवारी पाहिल्यास असे…

45 minutes ago

Pune News : पुण्यात रोड रेजचा धक्कादायक प्रकार; हॉर्न वाजवला म्हणून जोडप्याला मारहाण

पुणे : विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीचं क्षेत्र वाढतं चाललं आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या…

1 hour ago

Devmanus 3 : ‘या माप घेतो म्हणत’ देवमाणूस परत आला! पहा थरारक प्रोमो

मुंबई : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर पाच वर्षांपूर्वी 'देवमाणूस' (Devmanus) ही मालिका सुरु झाली…

1 hour ago

Abhijna Bhave: स्वामींच्या मठात जाताना अभिनेत्रीच्या नवऱ्याला आला वेगळाच अनुभव!

मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…

3 hours ago