Friday, March 21, 2025
Homeसाप्ताहिककोलाजकाव्यरंग : श्रावणात घन निळा

काव्यरंग : श्रावणात घन निळा

श्रावणात घन निळा बरसला रिमझिम रेशिमधारा
उलगडला झाडांतून अवचित हिरवा मोरपिसारा

जागून ज्याची वाट पाहिली ते सुख आले दारी
जिथे तिथे राधेला भेटे आता श्याम मुरारी
माझ्याही ओठांवर आले नाव तुझेच उदारा

रंगांच्या रानात हरवले हे स्वप्नांचे पक्षी
निळ्या रेशमी पाण्यावरती थेंबबावरी नक्षी
गतजन्मीची ओळख सांगत आला गंधित वारा

पाचूच्या हिरव्या माहेरी ऊन हळदिचे आले
माझ्या भाळावर थेंबाचे फुलपाखरू झाले
मातीच्या गंधाने भरला गगनाचा गाभारा

पानोपानी शुभशकुनाच्या कोमल ओल्या रेषा
अशा प्रीतिचा नाद अनाहत, शब्दावाचून भाषा
अंतर्यामी सूर गवसला, नाही आज किनारा

गीत – मंगेश पाडगावकर
गायक – लता मंगेशकर

घन ओथंबून येती

घन ओथंबून येती
बनांत राघू ओघिरती
पंखावरती
सर ओघळती
झाडांतून झडझडती

घन ओथंबून झरती
नदीस सागरभरती
डोंगरलाटा
वेढीत वाटा
वेढीत मजला नेती
घन ओथंबून आले
पिकात केसर ओले
आडोशाला
जरा बाजूला
साजण छेलछबिला
घन होऊन बिलगला

गीत – ना. धों. महानोर
गायक – लता मंगेशकर

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -