Saturday, March 15, 2025
Homeक्रीडाParis Olympics 2024: लक्ष्य सेनसाठी सेमीफायनलचे कठीण आव्हान, या दिग्गजाशी सामना

Paris Olympics 2024: लक्ष्य सेनसाठी सेमीफायनलचे कठीण आव्हान, या दिग्गजाशी सामना

मुंबई: पॅरिस ऑलिम्पिक २०२४मध्ये भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन शानदार कामगिरी करत आहे आणि त्याने पुरूष एकेरीच्या सेमीफायनलमध्ये स्थान मिळवले आहे. लक्ष्य सेनने क्वार्टरफायनलमध्ये चीन तैपेईच्या टिएन चेनला १९-२१, २१-१५, २१-१२ असे हरवले होते. पहिल्यांदा एखादा भारतीय बॅडमिंटन पुरुष खेळाडू ऑलिम्पिक गेम्सच्या सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. आता लक्ष्यला हा सामना जिंकत कमीत कमी रौप्य पदक पक्के करावे लागेल.

२२ वर्षीय लक्ष्य सेनचा सेमीफायनलमधील सामना टोकियो ऑलिम्पिक २०२०चा चॅम्पियन डेन्मार्कचा व्हिक्टरी एक्सेलसेनशी होणार आहे. तो सध्या जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे तर दोन वेळा वर्ल्ड चॅम्पियनशिप विजेता आहे. दुसरीकडे पीव्ही सिंधूसह सात्विकराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांची जोडी हरल्यानंतर आता पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनच्या सर्व आशा लक्ष्यवर टिकून आहेत.

मात्र लक्ष्य सेनसाठी हा सेमीफायनलचा सामना सोपा असणार नाही. एक्सेलसेन आणि लक्ष्य यांच्यात आठ सामने खेळवण्यात आले आहेत. यातील सात सामन्यांत डेन्मार्कच्या शटलरने बाजी मारली. लक्ष्यला केवळ एकच सामना जिंकता आला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -