Sunday, March 23, 2025
Homeक्रीडाParis Olympic 2024: लक्ष्य सेन एक दिवस सुवर्णपदक नक्की जिंकेल, सेमीफायनल जिंकणाऱ्या...

Paris Olympic 2024: लक्ष्य सेन एक दिवस सुवर्णपदक नक्की जिंकेल, सेमीफायनल जिंकणाऱ्या खेळाडूची भविष्यवाणी

मुंबई: पॅरिस ऑलिम्पिक २०२४मध्ये बॅडमिंटनमध्ये निराशाजनक बातमी समोर आली. पुरूष एकेरीच्या सेमीफायनलमध्ये लक्ष्य सेनला पराभव पत्करावा लागला.

लक्ष्य सेनला डेन्मार्कच्या व्हिटक्टर एक्सेलसेनने २२-२०, २१-१४ असे हरवले. आता लक्ष्य कांस्यपदकासाठी सामना खेळणार आहे.

पराभवानंतरही लक्ष्य अद्याप पदकाच्या शर्यतीत कायम आहे. आता कांस्यपदकाच्या लढतीत त्याचा सामना मलेशियाच्या ली जी जियाशी ५ ऑगस्टला होणार आहे.

सेमीफायनलमध्ये लक्ष्यने व्हिक्टरला चांगली टक्कर दिली होती. दोन्ही गेम्समध्ये सुरूवातीपासूनच लक्ष्यने मोठी आघाडी घेतली होती. मात्र ही आघाडी त्याला शेवटपर्यंत टिकवता आली नाही. व्हिक्टरच्या अनुभवी खेळाची या ठिकाणी प्रचिती आली.

या सामन्यानंतर व्हिक्टरने लक्ष्यची तोंडभरून कौतुक केले. तसचे आगामीकाळात एक दिवस लक्ष्य जरूर सुवर्णपदक जिंकेल अशी भविष्यवाणीही केली. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या व्हिक्टरने म्हटले की मला पूर्ण विश्वास आहे की भविष्यात एक दिवस तो सुवर्णपदक जरूर जिंकेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -