Sunday, March 16, 2025
Homeब्रेकिंग न्यूजNitesh Rane : वक्फ बोर्ड कायद्यात बदल करणं हे एनडीए सरकारचं मोठं...

Nitesh Rane : वक्फ बोर्ड कायद्यात बदल करणं हे एनडीए सरकारचं मोठं पाऊल!

भारताच्या इस्लामीकरणात मोठा अडसर येणार; हिंदूंच्या जमिनी परत मिळणार

नितेश राणे यांनी मानले एनडीए सरकारचे आभार

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारने (NDA Government) वक्फ बोर्ड कायद्यात (WAQF Board) बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे हिंदूंना त्यांच्या जमिनी पुन्हा मिळण्याची शक्यता आहे. यावर आज भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आपली भूमिका मांडली. सरकारने घेतलेल्या या धाडसी निर्णयाबद्दल त्यांनी सकल हिंदू समाजाच्या वतीने सरकारचे आभार मानले.

नितेश राणे म्हणाले की, मोदींजींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार उद्या वक्फ बोर्ड कायद्यात अमेंडमेंट करणार आहे, ही अतिशय स्वागतार्ह बाब आहे. कारण या वक्फ बोर्डच्या सगळ्या हालचालींमुळे असंख्य हिंदू लोकांच्या जमिनी हडपण्याचा जो प्रकार सुरु आहे, या भारताला इस्लाम राष्ट्र बनवण्यामद्ये वक्फ बोर्ड एक मोठी भूमिका निभावत आहे. या कायद्यात बदल करण्याची तयारी आमच्या सरकारने दाखवली आहे त्यामुळे असंख्य हिंदूंना त्यांच्या हडपलेल्या जमिनी परत मिळणार आहेत. तसेच भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्याच्या यांच्या मोहिमेमध्ये मोठ्या प्रमाणात अडसर निर्माण होईल, यामुळे मी एनडीए सरकार आणि मोदी साहेबांचे सकल हिंदू समाजाच्या वतीने मनापासून आभार मानतो, असं नितेश राणे म्हणाले.

वक्फ म्हणजे काय?

कोणतीही जमीन वक्फ (WAQF) होणे म्हणजे त्यावर कोणाचाही मालकी हक्क नाही. अशा स्थितीत ती जमीन वक्फ बोर्डाची मालमत्ता बनते आणि नंतर ती सार्वजनिक कामांसाठी वापरली जाते. एवढेच नाही तर, एखादी मालमत्ता वक्फ झाल्यानंतर ती पुन्हा खाजगी होऊ शकत नाही. तुमची मालमत्ता वक्फची आहे आणि तुमची नाही, असे वक्फ बोर्डाने सांगितले तर तुम्ही न्यायालयातही जाऊ शकत नाही. कोणताही मुस्लिम त्याच्या कोणत्याही मालमत्तेला वक्फ करू शकतो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -