मुंबई: भारत आणि श्रीलंका यांच्यात आज ४ ऑगस्टला रविवारी तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना खेळवला जात आहे. या सामन्याच्या आधी श्रीलंकेला मोठा झटका बसला आहे. खरंतर टीमचा स्टार ऑलराऊंडर वानिंदु हसरंगा मालिकेतील दोन्ही सामन्यातून बाहेर झाला आहेस. हसरंगा बाहेर झाल्याने श्रीलंकेसाठी ही समस्या ठरू शकते. हसरंगाच्या जागी जेफरी वांडरसेला संघात सामील करण्यात आले आहे.
हसरंगा दुखापतीमुळे वनडे मालिकेतील दोन सामन्यांतून बाहेर झाला आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियाच्या माध्यमातून हसरंगाच्या या दुखापतीबाबत अपडेट दिले. बोर्डाने लिहिले, वानिंदु हसरंगा वऩडे मालिकेतील बाकीच्या सामन्यांमध्ये खेळणार नाही. कारण त्याला दुखापत झाली आहे. पहिल्या वनडेदरम्यान आपल्या १०व्या षटकातील शेवटचा बॉल फेकताना त्याला दुखापत जाणवली. यानंतर एमआरआय काढल्यानंतर ही दुखापत समोर आली.
पहिल्या वनडेत शानदार कामगिरी
हसरंगाने पहिल्या वनडेत बॉल आणि बॅट दोघांनी योगदान दिले. पहिल्यांदा बॅटिंग करताना त्याने ३५ बॉलमध्ये १ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने २४ धावांची खेळी केली होती. त्यानंतर बॉलिंग करताना १० षटकांत ३ विकेट मिळवल्या होत्या.