मुंबई: डायबिटीज, वजन आणि हृदयाचे आरोग्य या तिघांचा संबंध एकमेकांशी आहे. अनेक रिसर्चनुसार डायबिटीज होण्यामागे वाढलेला लठ्ठपणा असतो. लठ्ठपणाचा संबंध हाय बीपी आणि हाय कोलेस्ट्रॉलसोबत असतो. दरम्यान, योग्य डाएट ठेवल्यास या आजारांपासून आपल्याला दूर ठेवू शकतात. दरम्यान, आम्ही ५ पदार्थांबद्दल सांगणार आहोत ज्यांच्या सेवनाने या आजारांविरोधात तुम्ही लढू शकता.
पालक
पालकाचा समावेश आपल्या डाएटमध्ये जरूर केला पाहिजे. यात व्हिटामिन ई, सी आणि के सोबतच आयर्न, कॅल्शियम आणि अँटी ऑक्सिडंट असतात. यामुळे बॉडीला भरपूर इम्युनिटी मिळते. सोबतच यात नायट्रेट नावाचे कम्पाऊंड ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यास मदत होते.
बदाम
बदामध्ये योग्य प्रमाणात मॅग्नेशियम असते. यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतो. अशातच हृदयासबंधित आजारांचा धोका कमी होतो.
हिरवे मूग
आपल्या डाएटमध्ये मुगाचा समावेश करावा. यामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. यामुळे हृदयाच्या आजारांपासून बचाव होतो.
ओट्स
ओट्समध्ये मँगनीज, फॉस्फरस, मॅग्नेशियम, कॉपर, आयर्न आणि झिंक आढळते. यात बीटा ग्लुकेन नावाचे सॉल्युबल फायबर असते. यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल आणि साखरेची पातळी कमी होते.
नाचणी
नाचणीमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, फायबर आणि फायटोन्यूट्रिएटचा चांगला स्त्रोत आहे. नाचणीमुळे ट्रायग्लिसराईड, एलडीएल, कोलेस्ट्रॉल आणि हाय बीपीचा त्रास कमी होण्यास मदत होते.