Monday, August 11, 2025

Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंच्या डोक्यावरचा ताबा सुटलाय!

Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंच्या डोक्यावरचा ताबा सुटलाय!

आपण औरंगजेब फॅन क्लबचेच आहोत हे त्यांनी आपल्या भाषणातून दाखवून दिलं


उद्धव ठाकरेंच्या टीकेला देवेंद्र फडणवीसांचे चोख प्रत्युत्तर


पुणे : 'उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या डोक्यावरचा ताबा सुटलाय. ते सध्या अत्यंत फ्रस्ट्रेशनमध्ये आहेत. त्या फ्रस्ट्रेशनमध्ये ते ज्या प्रकारचे शब्द वापरत आहेत, त्यावर आपण काय उत्तर देणार आहोत. एखादी व्यक्ती फ्रस्ट्रेशनमध्ये डोकं बिघाडल्यासारखे बोलत असते, त्यावेळी त्याला उत्तर द्यायचे नसते. अमित शाह त्यांच्याबद्दल म्हणाले होते की ते औरंगजेब फॅन क्लबचेच सदस्य आहेत. आज त्यांनी भाषण करून हे दाखवून दिलं आहे', असा घणाघात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला. उद्धव ठाकरेंनी पुण्यातील मेळाव्यात केलेल्या टीकेवर आज नागपुरात देवेंद्र फडणवीसांनी चोख प्रत्युत्तर दिले.


उद्धव ठाकरे यांनी पुण्यातील मेळाव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. भाजपचा राज्यात सत्ता जिहाद सुरू आहे, अमित शाह अहमदशाह अब्दालीचे राजकीय वंशज आहेत, असं ते म्हणाले. तर फडणवीसांचे नाव न घेता त्यांनी ढेकूण असा उल्लेख करत अप्रत्यक्षपणे टीका केली. यावर आता फडणवीसांनी देखील उद्धव ठाकरेंना चांगलेच फटकारले आहे. उद्धव ठाकरेंच्या डोक्यावरील ताबा सुटल्याने निराशेत ते अशा प्रकारे बोलत आहेत, अशी जहरी टीका फडणवीसांनी केली.



सचिन वाझेंच्या बाबतीत काय म्हणाले फडणवीस?


सचिन वाझेंनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. देवेंद्र फडणवीसांना मी पत्र पाठवले आहे, तसेच माझी नार्को टेस्ट करा असेही त्यांनी म्हटले आहे. याविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मला त्यांनी पत्र पाठवले हे मी तुमच्या माध्यमातूनच पहिले. अजून मी काही पाहिले नाही. कारण मी दोन दिवस नागपुरात आहे. असे काही आले असेल तर मी ते पाहून त्याच्यावर प्रतिक्रिया देईल. जे काही समोर येत आहे त्याची योग्य चौकशी करू, असे फडणवीसांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment