Sunday, April 20, 2025
Homeक्राईमNashik crime : नाशिकमध्ये दिवसाढवळ्या हत्याकांड! लोखंडी रॉडने सपासप १३ वार करत...

Nashik crime : नाशिकमध्ये दिवसाढवळ्या हत्याकांड! लोखंडी रॉडने सपासप १३ वार करत तरुणाला संपवलं

हल्ल्याचे कारण मात्र अस्पष्ट; पोलिसांचा तपास सुरु 

नाशिक : पुण्याप्रमाणेच आता नाशिकमध्येही गुन्हेगारीचे (Nashik Crime) प्रमाण वाढताना दिसत आहे. नाशिकमध्ये भरदिवसा दुचाकीवरुन जाणाऱ्या एका इसमाची तीन ते चार अज्ञात लोकांनी हत्या केल्याचा (Murder case) धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या हत्येचे कारणही अद्याप समजू शकलेले नाही. प्रमोद वाघ असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून एकूण तिघांनी त्याच्यावर हल्ला केला होता. काल संध्याकाळच्या सुमारास झालेल्या या घटनेने नाशिक परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकरोड सिन्नर फाटा परिसरातील यश टायर्स या दुकानासमोर ही घटना घडली. ३८ वर्षीय प्रमोद रामदास वाघ हे सायंकाळी सहाच्या सुमारास सर्व्हिस रोडने दुचाकीने जात होते. यावेळी संशयित योगेश पगारे आणि त्याच्या साथीदारांनी प्रमोद यांना अडवलं. त्याने जुन्या भांडणाची कुरापत काढून वाद घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी एकाने प्रमोद याच्यावर रॉडने हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. वार वर्मी लागल्यामुळे ते जागेवर कोसळला. आरोपी योगेश पगारे याने एकापाठोपाठ एक असे १३ वेळा लोखंडी रॉडने त्यांच्या डोक्यात वार केला. सोबत असलेल्या मित्राने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. पण तो काही ऐकण्याच्या परिस्थितीतच नव्हता.

या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. या हल्ल्याचा सीसीटीव्ही सध्या समोर आला असून हल्लेखोर अत्यंत निर्घृणपणे प्रमोद वाघ यांच्यावर हल्ला करताना दिसतोय. प्रमोद वाघ यांच्यावर हल्ला करून हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाला. तर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रमोद वाघ यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रमोद वाघ यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक होती. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

पोलिसांचा तपास सुरु

हा हल्ला नेमका कशामुळे घडला याची अद्याप माहिती समजू शकलेली नाही. घटनेची माहिती मिळताच नाशिकरोड पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे कर्मचारी हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -