काँग्रेस आणि शरद पवार गट उबाठावर नाराज
नाशिक : लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) ठाकरे गटाने सांगलीच्या जागेवर परस्पर उमेदवार जाहीर केल्याने महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) चांगलीच कटुता निर्माण झाली होती. याचा परिणामही दिसून आला आणि ठाकरेंचा पराभव झाला. मात्र, आता विधानसभेतही (Vidhansabha) ठाकरे गट पुन्हा तीच चूक करत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडला आहे. नाशिकच्या दिंडोरी जागेवर ठाकरे गटाने काँग्रेस (Congress) आणि शरद पवार गटासोबत (NCP Sharad Pawar Group) चर्चा न करता आपला उमेदवार जाहीर केला आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांनी ठाकरेंच्या विरोधी भूमिका घेतल्याचे चित्र आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची महत्वाची बैठक काही दिवसांपूर्वी पार पडली. या बैठकीत नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. तर नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाची निवडणूक माजी आमदार वसंत गिते (Vasant Gite) यांनी लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून एकमुखाने हा ठराव करण्यात आला.
मात्र, अशा प्रकारे परस्पर उमेदवारांच्या नावाचा ठराव करण्याला काँग्रेस आणि शरद पवार गटाकडून आक्षेप घेण्यात आला आहे. नाशिक मध्यची जागा कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस पक्षाला सुटली पाहिजे, असा काँग्रेस बैठकीत ठराव झाल्याची माहिती काँग्रेस प्रवक्त्या हेमलता पाटील (hemlata patil) यांनी दिली आहे. तर ठाकरे गटाने उमेदवारांची नावे एकमताने ठरवली त्यामुळे त्यांना शुभेच्छा असा खोचक टोलाही शरद पवार गटाचे माजी आमदार नितीन भोसले (Nitin Bhosale) यांनी लगावला आहे.