Monday, April 21, 2025
Homeकोकणरायगडकर्जत-खालापूरमध्ये सुरक्षित सोसायटी अभियान

कर्जत-खालापूरमध्ये सुरक्षित सोसायटी अभियान

सुधाकर घारे यांचा उपक्रम; नागरिकांचा मोठा प्रतिसाद

कर्जत : गेल्या काही दिवसांपासून कर्जत-खालापूर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसाळ्यात साथीचे आजार पसरण्याचा धोका मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांच्या माध्यमातून सुधाकर भाऊ घारे फाऊंडेशन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे कर्जत, नेरळ आणि खोपोली या शहरांमध्ये सुरक्षित सोसायटी अभियान २०२४ अतंर्गत जंतूनाशक फवारणी करण्यात येत असून, नागरिकांचा या अभियानाला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

सुधाकर भाऊ फाऊंडेशनच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सुधाकर घारे यांनी कर्जत-खालापूर तालुक्यात सुरक्षित सोसायटी अभियान २०२४ उपक्रम हाती घेतला आहे. खालापूर तालुक्यातील खोपोली शहरात हे अभियान आता पूर्णत्वाकडे आले असून, कर्जत शहरात मंगळवारी (दि.३०) रोजी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आहे. तसेच नेरळ (ता. कर्जत) शहरात देखील सुरु करण्यात येणार आहे. या अभियानाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

कर्जत खालापूर तालुक्यात सुधाकर घारे यांच्या माध्यमातून नेहमी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. उन्हाळ्यात कर्जत खालापूर तालुक्यात भीषण पाणी टंचाई उद्भवते, त्यामुळे गेल्या काही वर्षांपासूव वाड्या वस्त्यांवर टॅँकरव्दारे पाणी पुरवठा, पावसाळ्यात नागरिकांना ताडपत्री वाटप, विद्यार्थी पालकांना शासकीय दाखल्यांसाठी अडचणी येऊ नयेत त्याकरिता शासकीय दाखले वाटप, रुग्णसेवेसाठी रुग्णवाहिका असे अनेक सामाजिक उपक्रम घारे यांच्या माध्यमातून राबविले जातात.

नागरिकांच्या आरोग्याची काळजी

पावसाळ्यात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने साथीचे आजार फैलावतात. त्यामुळे नागिकांच्या सुरक्षेसाठी सुधाकर घारे यांच्या माध्यमातून सुरक्षित सोसायटी अभियान २०२४ राबविले जात आहे. नागिकांचे आरोग्य सदृढ आणि सुरक्षित राहिले पाहिजे, साथीच्या आजारांना आळा बसला पाहिजे, शहरातील सार्वजनिक ठिकाणे आणि सोसायट्यांचा परिसर स्वच्छ राहिला पाहिजे या सामाजिक भावनेतून राबविण्यात येत असलेल्या अभियानाचे नागरिकांकडून देखील मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे.

कर्जत खालापूर तालुक्यात पावसामुळे अस्वच्छता आणि दुर्गंधीमुळे रोगराई पसरुण्याचा धोका आहे. त्यामुळे लोक आजारी पडू नयेत, त्यांचे आरोग्य चांगले रहावे या भावनेतून कर्जत, खोपोली, नेरळमध्ये सुरक्षित सोसायटी अभियान राबविण्यात येत आहे. खोपोलीतील अभियान आता पूर्ण होत आले असून कर्जतमध्ये शुभारंभ करण्यात आला आहे, आता नेरळमध्ये देखील आम्ही हे अभियान सुरु करणार आहोत. – सुधाकर घारे, माजी उपाध्यक्ष, रायगड जिल्हा परिषद.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -