मुंबई: पॅरिसमध्ये सुरू असलेल्या ऑलिम्पिक २०२४मध्ये विविध देशांचे खेळाडू खेळत आहेत. येथे ११७ सदस्यीय खेळाडूंचे भारतीय पथक पोहोचले आहे. भारताच्या खात्यात तीन मेडल्स आले आहेत. तसेच इतर देशांचे खेळाडूही पदक जिंकत आहेत. अशातच माल्डोवादा एक ज्युडो खेळाडू आदिल ओस्मानोवाने कांस्यपदक जिंकले. विजयानंतर त्याने अशा जोशात जल्लोष केला की त्यांच्या खांद्यालाच दुखापत झाली.
आदिलने ७३ किलो वजनी गटात इटलीच्या मॅन्युअल लोम्बार्डला हरवत कांस्यपदक पटकावले. पदक जिंकल्यानंतर आदिल खूपच उत्साहित होता. तो आनंदाने उसळला आणि आपल्या गुडघ्यांवर बसला. त्याने जोरात हवेत हात उचलला यामुळे त्यांचा खांदा डिसलोकेट झाला. मात्र त्यानंतर त्याला खूप दुखू लागले.
मग तो खांदा पकडला आणि बाकी खेळाडूंसह तो पोडियमवर गेला. मिडिया रिपोर्ट्सनुसार त्यलाला ऑलिम्पिकआधी खांद्याची सर्जरी करण्यास सांगितली होती. इतकंच नव्हे तर तो सामन्याआधीही आजारी होता.