Monday, August 4, 2025

Paris Olympics 2024: भारतीय हॉकी संघाने ऑस्ट्रेलियाला तब्बल ५२ वर्षांनी चारली पराभवाची धूळ

Paris Olympics 2024: भारतीय हॉकी संघाने ऑस्ट्रेलियाला तब्बल ५२ वर्षांनी चारली पराभवाची धूळ

मुंबई: भारतीय पुरूष हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिक २०२४च्या आपल्या ग्रुप सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळवला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ३-२ हरवले. २ ऑगस्टला शुक्रवारी खेळवलेल्या सामन्यात भारताकडून अभिषेक आणि कर्णधार हरमनप्रीत सिंहने गोल केले. तर कांगांरूच्या टीमकडून थॉमस क्रेग आणि ब्लेक गोवर्सने स्कोर केले.


भारतीय हॉकी संघाने तब्बल ५२ वर्षांनी ऑस्ट्रेलियाला ऑलिम्पिक गेम्समध्ये हरवले. १९७२मध्ये म्युनिच ऑलिम्पिकनंतर भारताने ऑस्ट्रेलियाला हरवायची ही पहिलीच वेळ आहे. म्हणजेच भारतीयांसाठी कांगारूंविरुद्धचा हा विजय अतिशय ऐतिहासिक आहे. भारतीय संघ आधीच क्वार्टरफायनलमध्ये पोहोचला होता.



असा रंगला सामना


या सामन्यात पहिल्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाचा दबदबा राहिला. त्यांनी दोन गोल केले. पहिला अभिषेकने फिल्ड गोल केला. हा गोल जबरदस्त झाला. त्यानंतर भारताचा कर्णधार हरमनप्रीत सिंहने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत भारतीय संघाला २-० असे पुढे नेले.


दुसऱ्या क्वार्टरमध्ये ऑस्ट्रेलियाने कमबॅक केले. थॉमस क्रेगने पेनल्टी कॉर्नरच्या माध्यमातून गोल केला. तिसऱ्या क्वार्टरमध्ये कर्णधार हरमनप्रीत सिंहने पेनल्टी स्ट्रोकवर गोल करत भारताला ३-१ ने आघाडी मिळवून दिली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा