मुंबई: डायबिटीज सध्याच्या दिवसांत वेगाने वाढणारा आजार बनला आहे. यावर कोणताही उपचार नाही. डायबिटीज केवळ नियंत्रणात ठेवता येतो. डायबिटीजमुळे रक्तातील साखर प्रभावित होते. रक्तातील वाढलेली साखर पाचन, हृदयाचे आरोग्य, स्किन, किडनी आणि लिव्हर फंक्शनसोबत झोपेवरही परिणाम करते.
डायबिटीजच्या रुग्णांना पुरेशी झोप येत नाही अथवा त्यांची झोप वारंवार उघडते. या कारणामुळे त्यांची झोप पूर्ण होत नाही. अशातच त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. याशिवाय कमी झोपेमुळे डायबिटीजचा धोकाही असतो.
कमी झोपेमुळे डायबिटीजचा धोका
रिसर्चनुसार कमी झोपेचा संबंध डायबिटीजशी आहे. दिवसांतून ५ तास झोप घेणाऱ्यांमध्ये डायबिटीजचा धोका १६ टक्के असते. तर केवळ ३ ते ४ तास झोप घेणाऱ्यांमध्ये डायबिटीज टाईप २चा धोका ४१ टक्के इतका असतो. हेल्दी डाएट घेतल्यानंतरही जर तुम्ही कमी झोपत असाल तर डायबिटीजचा धोका अधिक असतो.
डायबिटीज रुग्णांची झोपमोड का होते
टाईप २ डायबिटीजच्या रुग्णांमध्ये असंतुलित ब्लड शुगर लेव्हल आणि डायबिटीजशी संबंधित लक्षणांमउळे झोपेची समस्या येते. रात्री हाय शुगर लेव्हल आणि लो शुगर लेव्हल अनिद्रा आणि दिवसभर थकव्याचे कारण बनू शकते.