Saturday, September 13, 2025

केवळ आनंदच नव्हे तर सुबत्ताही आणतात घरात पाळले जाणारे प्राणी

केवळ आनंदच नव्हे तर सुबत्ताही आणतात घरात पाळले जाणारे प्राणी

मुंबई: अनेकजण आपल्या घरात विविध प्राणी पाळतात. कोणाला कुत्रा पाळायला आवडतो तर कोणाला मांजर. कोणी आपल्या घरात पोपट पाळतात तर काहीजण गाय, म्हैस. आपल्या घरात पाळल्या जाणाऱ्या प्राण्यांसोबतही आपले नाते इतके गाढ होते की ते आपल्या घरातील एक सदस्यच होऊन जातात.

या प्राण्यांची आपल्या मुलाप्रमाणे प्रेमाने काळजी घेतली जाते. मात्र तुम्हाला माहीत आहे का की वास्तुशास्त्रात अशा काही प्राण्यांबद्दल सांगण्यात आले आहे ज्यांना घरात पाळल्यास सकारात्मक ऊर्जा येते. सोबतच हे प्राणी आपल्या घरात सुख-समृद्धी घेऊन येतात.

मासे

तुम्ही मासे पाळण्याच्या फायद्याबद्दल खूप ऐकले असेल तसेच अनेक घरांमध्ये पाहिलेही असेल. वास्तुशास्त्रात मासे पाळणे शुभ मानले गेले आहे. असे मानतात की मासे पाळल्याने घरात आर्थिक तंगी येत नाही तसेच नेहमी घरात भरभराट राहते.

पोपट

तुम्ही अनेक घरांमध्ये पोपट पाळलेला पाहिला असेल. वास्तुनुसार पोपट तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा आणतो. अशा घरात नेहमी आनंदाचे वातावरण असते. मात्र लक्षात ठेवा की पोपट पाळताना त्याची पूर्ण काळजी घ्या. तसेच तो नेहमी खुश राहील याकडे लक्ष द्या.

ससा

हा एक छोटासा जीव अतिशय कोमल असतो. ससा पाळणेही शुभ मानले गेले आहे. सोबतच म्हटले जाते की ससा पाळल्याने घरात शुभ गोष्टी होतात. यामुळे घराचे वातावरण चांगले राहते. सोबतच धन प्राप्तीचेही संकेतही मिळतात.

Comments
Add Comment