मुंबई: केरळच्या वायनाड जिल्ह्यात सोमवारी झालेल्या भूस्सखलनात येथील चार गाव भुईसपाट झाले. या नैसर्गिक आपत्तीमुळे आतापर्यंत २५६ जणांचा मृत्यू झाला आहे तर मोठ्या संख्येने लोक जखमी झाले आहेत. अद्यापही अनेकजण मलब्याखाली दबले असण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत ३ हजार लोकांना रेस्क्यू करण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे चिखल, डोंगराचे भाग तसेच झाडांचे मोठमोठे भाग पडल्यामुळे रेस्क्यू ऑपरेशनमध्ये समस्या येत आहेत. चूरलमाला च्या मुंडक्कई दरम्यान जो पूल वाहून गेला होता त्याला सैन्याचे जवान पुन्हा बनवत आहेत. यामुळे रेस्क्यू ऑपरेशनमध्ये वेग येईल. आज दुपारपर्यंत चूरलमालाला मुंडक्कईला जोडणारा १९० फूट हा पूल बनून तयार होईल.
राहुल गांधी-प्रियंका गांधी वायनाडसाठी रवाना
लोकसभेतील विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी नवी दिल्ली येथून वायनाडसाठी रवाना झाले आहेत. ते आपल्या संसदीय क्षेत्राची पाहणी करण्यासाठी तिथे पोहोचत आहेत. त्यांच्यासोबत प्रियंका गांधीही आहेत. भूस्सखलनामुळे प्रभावित झालेल्या कुटुंबाची ते भेट घेतील. आधी दोन्ही नेते बुधवारी वायनाडला जाणार होते मात्र खराब हवामानामुळे त्यांना आपला कार्यक्रम स्थगित करावा लागला.
चार गावे झाली नष्ट
वायनाडमधील निसर्गाच्या प्रकोपाने साऱ्यांनाच हादरवून सोडले आहे. अनेक घरे मलब्याखाली दबली आहेत. नदीच्या रस्त्यांमध्ये जे कोणी आले ते वाहून गेले. झाडेच्या झाडे उन्मळून पडली. मोठे मोठे दगड नदीद्वारे वाहून आले होते. काही वेळातच अनेक घरे ढिगाऱ्याखाली दबली गेली.